आज शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी खूप महत्वाचा दिवस होता . आज दिवाळी नंतरचा पहिला ओपन डे प्रत्येक शाळेत साजरा झाला. साजरा हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण आपण पालक हा दिवस साधारण एका महत्वाच्या सणासारखा सारखा साजरा करतो.
कधी - कधी आपल्या काय चुका होतात हे त्रयस्थ पणे पाहणे गरजेचे असते . आजच्या दिवसाकडे मी एक पालक म्हणून नव्हे तर एक त्रयस्थ यक्ती म्हणून पाहत होते कारण एक पालक म्हणून माझ्या काय चुका होतात त्या मला पहायच्या होत्या त्यावेळी मला काही गोष्टी निदर्शनास आल्या त्या मी तुमच्या समोर मांडणार आहे बघा तुमचा अनुभव हाच होता का..
आजच्या दिवसामध्ये मला तीन चेहरे मुख्य भूमिकेत दिसले काळजी वाहू पालक , घाबरलेले ,बावरलेले विद्यार्थी , पालक व मुले यांचा दुवा असलेले शिक्षक. आज मुलांचे व पालकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते . वर्ग शिक्षकांनी आत बोलावलं ,हातात पेपर दिले .पेपर तपासणे चालू झाले मुलांनी कुठे चुका केल्या यापेक्षा शिक्षकांनी गुण द्यायला कुठे चुका केल्या याकडेच जास्त लक्ष होते . गुंणाची बेरीज बरोबर आहे का ते दोन -दोन वेळा पडताळून पाहिले गेले . जे पालक मुलांचा अभ्यास घेतात त्यांना मुलांनी कुठे चुका केल्या ते लक्षात आले जे पालक शिकवणीवर अवलंबून आहेत त्यांनी फक्त पेपर चाळला . कमी गुण मिळालेल्या मुलांची व पालकांची अवस्था झाकली मूठ सव्वा लाखाची अशी होती मूग गिळून दोघे गप्प होते कारण वाच्यता करून चालणार नव्हते कारण यात दोघांचा पण अपमान होता शेवटी स्टेटस चा प्रश्न आहे. काही गोष्टी पालकांच्या मला आवडल्या नाहीत .
पालकांची एक अतिशय घाणेरडी सवय दुसऱ्यांच्या पेपर मध्ये डोकावून पाहणे ,काही पालक तर मुद्दाम मागे बसतात . हीच सवय मुलांना आपल्या मित्राला आपल्या पेक्षा कमी किंवा जास्त गुण आहेत ना ते हळूच डोकावून पाहत होती . इतर मुलांच्या प्रगतीवरून थोडीच तुमच्या मुलांची प्रगती ठरणार आहे उलट त्यांना तुलना करायची सवय लागत आहे आणि ही सवय खूप घातक आहे .
कमी गुण मिळाली म्हणून एखादा विद्यार्थी बिनडोक आहे असे नाही . प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असू शकते .मुलांच्या वाढीच्या , आकार देण्याच्या काळातला हा खूप महत्वाचा टप्पा आहे आपण पालक म्हणून असे प्रसंग कसे हाताळायचे याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे . उद्याच्या यशाला अपयशाला मुलांना आपल्याला खंबीर बनवायचे आहे .मुलांचे गुण हि गौण गोष्ट आहे आपले संस्कार आपली वागणूक मुलांच्या अंगवळणी पडत आहे आपले अनुकरण आपली मुले करत आहेत त्यामुळे खूप सजगतेने वागणे गरजेचे आहे. पालकांनी मुलानं मध्ये तुलना करणे बंद करणे आवश्यक आहे
आपण पालक म्हणून मुलांना मोबाइल व टीव्ही च्या विळख्यातून बाहेर काढणे हे महत्वाचं आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे . मुलांना या व्यसनातून सोडवताना त्यांना नवीन पर्याय मिळून द्यायचे आहेत.उद्याची पिढी आपण घडवत आहोत तरी सर्व पालकांना विनंती आहे कि , गुंणाकडे लक्ष न देता त्यांच्या वागणुकीकडे ,संस्काराकडे ,मुलांच्या दिनचर्येकडे आपण अधिक लक्ष देऊ या ..
हा मी घेतलेला अनुभव आहे . तुम्ही घेतलेले अनुभव वेगळे असू शकतात..
ओपन डे म्हणजे पालक-शिक्षकांच्या संवादासाठी एक महत्त्वाचा मंच. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या वर्तन, सहभाग, आणि अतिरिक्त उपक्रमांबाबत चर्चा होते. शिक्षक मुलांच्या क्षमतांची आणि आव्हानांची ओळख करून देतात, तर पालक त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हा संवाद मुलांच्या भविष्याला दिशा देणारा ठरतो.
पालकांना आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. जर मुलांनी या अपेक्षांप्रमाणे कामगिरी केली नाही, तर ओपन डेच्या निमित्ताने मुलांना दबावाला सामोरे जावे लागते. कधी कधी पालकांच्या टीकेमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो.
काही वेळा ओपन डेच्या चर्चेत दोषारोपाची स्थिती निर्माण होते. पालक मुलांच्या अपयशाचे कारण शिक्षकांच्या पद्धतीत शोधतात, तर शिक्षक घरातील वातावरणाला दोष देतात. यामुळे संवादाची गुणवत्ता कमी होते आणि उपाययोजनांकडे दुर्लक्ष होते.
ओपन डे दरम्यान मुलांना आपल्या चुका समजावून सांगण्याऐवजी त्यांना अप्रत्यक्षपणे अपराधी ठरवले जाते. यामुळे त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि शिक्षणाविषयी त्यांचा उत्साह कमी होतो.
ओपन डे प्रामुख्याने शैक्षणिक गुणांवर लक्ष केंद्रित करतो. मात्र, मुलांच्या इतर कौशल्यांचा विचार केला जात नाही. वाचन, वक्तृत्व, कला, क्रीडा अशा क्षेत्रांतील योगदानालाही महत्त्व दिले पाहिजे.
समस्या सोडवण्यासाठी उपाय
1. संवेदनशील संवाद:
पालक आणि शिक्षकांनी संवाद संवेदनशील आणि सकारात्मक ठेवावा. मुलांच्या चुका दाखवताना त्यांच्यात सुधारणा घडवण्यासाठी प्रेरणा द्यावी.
2. संपूर्ण प्रगतीचा विचार:
फक्त गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुलांच्या वर्तणूक, स्वभाव, आणि सर्वांगीण प्रगतीवर चर्चा करावी. यामुळे मुलांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढेल.
3. मुलांनाही संधी द्या:
ओपन डेच्या चर्चेत मुलांनाही सामील करून घ्यावे. त्यांना आपली बाजू मांडण्याची आणि सुधारणा करण्याची संधी दिल्यास ते अधिक जबाबदारीने वागतील.
4. प्रश्न सोडवण्यावर भर:
दोषारोप न करता समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांनी पालकांना घरगुती उपाय सुचवावे, आणि पालकांनीही शाळेसोबत सहकार्य करावे.
ओपन डे हा मुलांच्या विकासासाठी महत्त्वाचा असला तरी, त्याचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. पालक-शिक्षकांनी हा दिवस एका सकारात्मक अनुभवामध्ये बदलावा, जिथे प्रत्येक मुलाची क्षमता ओळखली जाईल आणि त्यांना अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरित केले जाईल. संवाद, समजूतदारपणा, आणि सहकार्याचा दृष्टिकोन हीच ओपन डेची खरी यशाची गुरुकिल्ली आहे.
खूप छान
उत्तर द्याहटवा