नात्यातील अंतर
अंतर हे परिमाण आपण गणितातच वापरतो. दोन शहरातील अंतर, दोन वस्तू मधील अंतर अश्या बऱ्याच कारणांसाठी आपण हा शब्द वापरतो पण तुम्ही कधी नात्यातील अंतराबद्दल कधी वाचलं आहे का? कधी विचार तरी केला आहे का??
आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या नात्यात गुंतले गेलेलो आहोत. आपण नवरा, बायको, आई, बाबा, आजी, आजोबा, भाऊ ,बहीण अश्या अजून कितीतरी नात्यात आपण बांधले गेलो आहोत. यातील काही नाती अशी आहेत की,अंतराने दूर आहेत त्यांची गाठ भेट कमी होते. काही नाती अशी आहेत की ती इतकी जवळ असतात की त्यात अजिबात अंतरच नसते जसे नवरा - बायको , सासू-सून, आई- मुलं, भाऊ -बहीण. ही नाती इतकी जवळची आहेत की, यातलं अंतर आपण कधीच काढू शकत नाही. अंतर खुप कमी झालं की नात्यांची रेलचेल होते. अपेक्षा वाढतात , गृहीत धरलं जातं मग ही नाती एकामेकावर आपटली जातात व परिणामी वाद -विवाद वाढतात.नात्यात वितुष्ट निर्माण होतं कदाचित आपण याचा अनुभव बरेच वेळा घेत असतो म्हणून मला वाटतं की प्रत्येक नात्यात अंतर हवंच ते नातं भलही किती जवळचं असो. प्रत्येक व्यक्तीने आपला स्वाभिमान जपून ऐक विशिष्ट अंतर ठेवलं पाहिजे.
ज्या महिला गृहिणी आहेत म्हणजे समाज्याच्या दृष्टीने काहीही न करणाऱ्या त्यांनी तर हे अंतर जाणून बुजून ठेवलं पाहिजे. गृहिणी आपलं सत्व हरवून कुटुंबाशी एकरूप होतात घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांना गृहीत धरू लागतो व हे अंतर संपुष्टात येतं म्हणून योग्य नात्यातल अंतर जपू व स्वाभिमानाने व ताठ मानेने जगायला शिकू...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment