गाणं मनातलं
माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी हानी किंव्हा नुकसान म्हणजे मृत्यु आपण कुठलीही हानी भरून काढू शकतो जसे पैशाचे ,संपत्तीचे नुकसान झाले ते भरून काढता पण मृत्यूचे नुकसान भरून काढता येत नाही.
जन्म मृत्यू आपल्या हातात नाही हे माहिती असतं तरी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यु सहन करू शकत नाही. आपण जन्म घेतो तेंव्हा एकटेच येतो वेगवेगळी नाती येतात मित्रमंडळी जुळतात या सर्वांची आपल्याला एवढी सवय होते की आपण पूर्णपणे त्या व्यक्तीवर अवलंबून राहतो.ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल याची कल्पना ही आपण सहन करू शकत नाही. ज्या घरातला कर्ता पुरुष जग सोडून जातो,भरलेल्या संसारातून स्त्री निघून जाते त्यावेळी असं वाटत जी व्यक्ती आजाराने वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळून आहे त्याला देव घेऊन जात नाही व अश्या तरुण व्यक्तीला का बरं घेवून जात असेल या मागचं देवाचं काय गणित असेल.आशाच ऐका कुटुंबाला भेट दिली सांत्वन केलं आमच्या सारखी कितीतरी लोक येऊन जातात चार शब्द प्रमाचे बोलून जातात पण शेवटी त्यांचं त्यांनाच बघावं लागतं कोणाचं दुःख कोणी घेऊ शकत नाही हेच खरं .त्यांचं दुःख पाहून मला हि आमच्या कुटुंबाचाही त्यावेळची अवस्था आठवली
असच ऐक भलं मोठं संकट तेरा वर्षापूर्वी माझ्या कुटुंबावर येऊन गेलं माझा तरुण भाऊ हे जग सोडून गेला. काळ हेच त्याच्यावरच औषध. अशी व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाते त्यावेळी आठवणीने मन भरून येते . गेलेल्या व्यक्तीला खूप बोलावसं वाटतं खूप काही सांगायचं असतं , आम्हाला सोडून का गेला असं विचारायचं असतं पण अशी व्यक्ती आपल्यात नसते . त्यांचा पत्ता ,नंबर काहीच नसतो अशा वेळी हे गाणं डोळ्याच्या अश्रू सोबत आठवतं
चिठ्ठी ना कोइ संदेस जाने वो कौन सा देस
जहां तुम चले गए
इस दिल पे लगा के ठेंस जाने वो कौन सा देस
जहां तुम चले गए
तुमच्याही आयुष्यात देव न करो पण असं कोणी अचानक निघून गेलं असेल तर हे गाणं नक्की ऐका व अश्रुला वाट करून द्या.आमच्या भावनांना वाट करून दिल्या बद्दल या गाण्याचे खूप खूप आभार
ReplyForward
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment