'श्यामची आई '
माझं व 'श्यामची आई ' या पुस्तकाचं नात हे शाळेत असल्या पासूनच. हे पुस्तक मी डोळ्यांनी नाही तर मनाने वाचलं होतं म्हणून कदाचित हे पुस्तक माझ्या परत वाचनात आले. शाळेत असताना श्यामच्या भूमिकेतून वाचलं होतं आता आई या भूमिकेतून. डोंबिवली तील टिळक नगर शाळेत पुस्तकांची अदलाबदल करण्याचं मोठं प्रदर्शन लागलं होतं तेथून मी माझ्या मुलासाठी हे पुस्तक घेऊन आले. आपली मुलं इंग्रजी माध्यातून शिकणारी त्यामुळे मराठी वाचता येत नाही,वाचता आलं तर भारी भारी शब्दांचे अर्थ कळत नाही.मी ठरवलं आता मीच याला पुस्तक वाचून दाखवीन. सानेगुरुजी चे थोर विचार, लेखनशैली, कोकणातील खेडेगाव, तिथलं केलेलं वर्णन त्याच्या पचनी पडत नव्हतं मध्येच म्हणजे काय, म्हणजे काय चालू असतं. हे माझ्या मुलाच्या बाबतीत नाही तर तुमच्या मुलांच्या बाबतीत पण असेल.
श्याम ची आई या पुस्तका तील संस्कार कथा आपल्या मुलानं पर्यंत पोहचल्या पाहिजे.सानेगुरुजी नी मांडलेले विचार, प्रत्येक प्रसंगात आई ने घडवलेले संस्कार, श्यामचे आचरण आपल्या मुलांना कळले पाहिजे.आपण जर या कथा आधुनिक गोष्टीतून मुलांसमोर मांडल्या तर ते शक्य आहे हे सुंदर पुस्तक परत बोलतं होऊ शकत.
आपला व आपल्या मुलांचा खुप सुंदर संवाद होऊ शकतो. तेवढाच मोबाईल ला आराम
असा छोटासा प्रयत्न मी करून पाहणार आहे तुम्ही ही करून बघा , बघू जमतंय का...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment