मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

जत्रा

                                                                         जत्रा
                                               Jatra 

जत्रा हा गावोगावचा मोठा आनंदाचा ठेवा. आजच्या काळातही जत्रेविषयीची आपुलकी कायम राहिली आहे. बदलत्या काळात काही गोष्टी बदलल्या असल्या, तरी जत्रेचं आकर्षण बदललेलं नाही. ‘जुनं ते सोनं’ म्हणतात, ते या जत्रांबाबत घडतं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘गावच्या जत्रेला काय जायचं,’ असं म्हणून नाकं मुरडणारी शहरी तरुण मंडळी अलिकडे जत्रेकडे वळू लागली आहे. त्यामागे हेतू सहलीचा असतो किंवा फोटो इव्हेंटचा; पण ते जत्रेत सहभागी होत आहेत. काहीवेळा तर वेगवेगळ्या गावांतली जत्रा अनुभवण्यासाठी तसं प्लॅनिंगही करत आहेत. गावाकडे घर असलेल्या मित्राचं जत्रेचं आमंत्रण आता आवर्जून स्वीकारलं जातं आहे. जत्रा फेस्टिव्हलचा आनंद आता समजू लागला आहे.
अंबरनाथमध्ये नुकतीच  महाशिवरात्रीनिमित्त जत्रा झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जत्रेला भेट दिली . माझं बालपण छोट्याश्या गावात गेले त्यामुळे वर्षातून एकदा येणारी जत्रा मला खूप आवडायची व आताही मला जत्रा तेवढीच आवडते . कालच्या जत्रेत काही गोष्टी अनुभवल्या ..
जत्रेत येणारे हौशे - नवशे - गौशे  असे तिन्ही प्रकारचे लोक होती  .हौशे म्हणजे हौशी लोकं जी अगदी हौसेने आनंदानी मुलांना बायकोला घेऊन येणारी अगदी नटून थटून जत्रेचा आनंद घेत  होती . नवशे म्हणजे  खास  देवाचं दर्शन घेण्यासाठी देवासमोर नवस करण्यासाठी हि मंडळी आली होती .गौशे म्हणजे चोरी मारी च्या दृष्टीने हि लोकं आली होती या सर्व गटातील लोक आपापला आनंद लुटत होती. आपला यातला हौशे हा गट .
वर्षभर मॉलमध्ये ,सुपरमार्केट मध्ये फिरणारे आपण पण जत्रेत फिरण्याचा आनंद काय वेगळाच असतो ना. जत्रा म्हणजे काय मॉलच ना फक्त इथे AC  नसतो व भारीचे  कपडे घालणारे सेल्स पर्सन नसतात . मॉल प्रमाणे कपडे ,भांडी ,खाऊ ,खेळणी ,दागिने असे सर्व प्रकार जत्रेत असतात .वर्षभर आपल्याला या सर्व गोष्टी मिळतात मग आपण जत्रेत का जातो ??
मॉल मध्ये जे नसत ते सर्व जत्रेत असतं जोरजोरात वाजणारी पिपाणी असते , विक्रेत्याकडे केलेली घासाघीस असते ,पाळणे वरती गेल्यानंतर काढलेला आवाज असतो , दोन पैसे मिळाल्यावर चेहऱ्यावरचा आनंद असतो. स्वतःच्या हातानी बनवलेल्या कितीतरी छोट्या मोठ्या वस्तू घेऊन आलेलं पूर्ण कुटुंब असतं. ग्राहकांचे चेहरे बघून सांगितलेल्या किमती असतात.वस्तूंचे भाव शंभराच्या पटीत नाही तर दहाच्या पटीत असतात .ग्राहकांच्या चेहऱ्यावर पन्नास टक्के डिस्काउंट करून घेतल्याचा आनंद असतो.घरी जाताना विक्रेत्याच्या चेहऱ्यावर कमाईचा आनंद असतो तर ग्राहकांच्या चेहऱ्यावर  पाचशे रुपयात दोन पिशव्या भरून घेऊन जाण्याचा आनंद असतो .म्हणूनच तर ती जत्रा असते ...

1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template