आत्मपरीक्षण
कुठलीही नवीन गोष्ट शिकली कि मला खूप आनंद होतो व ती गोष्ट इतरांना शिकवायला मला खूप आवडतं. ही माझी सवय मला एवढे दिवस खूप छान वाटत होती पण चार दिवसापूर्वी हि गोष्ट मला महागात पडली . असाच एक शेअरिंग चा मेसेज एका ग्रुप वरती केला व तिथून माझी हकालपट्टी झाली मला त्या ग्रुप मधून लेफ्ट केलं. मला अगोदर कळलंच नाही कि मला का काढून टाकलं,माझा हेतू तर चांगला होता. खूप विचार केल्यानंतर व ग्रुप ऍडमिन नि सांगितल्या नंतर माझ्या लक्षात आलं कि हेतू चांगला होता पण ग्रुप चुकीचा होता.
माझी चूक माझ्या लक्षात आली पण मन खूप नाराज झालं,कशातच लक्ष लागत नव्हतं, आपण किती मूर्ख आहोत आपल्याला एवढंही कळत नाही अशी मनाला सारखी टोचणी देत होती. मला खूप दडपण आल्या सारखं वाटत होतं.
मला असं का होतंय म्हणून आत्मपरीक्षण केलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं कि, माझ्या मनाला सतत चांगलं म्हणून घेण्याची सवय लागली आहे. आपण करतोय ते सर्वच छान आहे ,मी कधी चुकतंच नाही असा दुराभिमान मला आला आहे म्हणून मला एवढा त्रास होतोय.
आपण बरेच वेळा म्हणतो कि मुलांना नकार ऐकण्याची ,त्यांच्या मनाविरुद्ध करण्याची सवय लावली पाहिजे, सारखं त्यांच्या मनाप्रमाणे करायचं नाही पण या प्रसंगावरून माझ्या लक्षात आलं कि आपल्यालाही या गोष्टीची गरज आहे. मी करेन ते बरोबरच आहे मी चुकणार नाही असा समज चुकीचा आहे . आपण माणूस आहोत आपल्याकडून चूक तर होणारच पण चूक कबूल करायची सवय लागली पाहिजे. स्वतःला सतत दोष न देता केलेली चूक परत नाही होणार याची दक्षता घेणे हेच योग्य आहे
जे होतं ते चांगल्यासाठी होतं, मी ग्रुप मधून लेफ्ट झाली नसती तर एव्हढी महत्वाची गोष्ट मला कळलीच नसती व खूप छान, खूप छान च्या भ्रमात राहिली असती .
कधीतरी तुम्हीही अशा प्रसंगाला सामोरे गेला तर आत्मपरीक्षण नक्की करा दडपण दूर होईल व मनावरचा भार कमी होईल ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment