मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, १ मार्च, २०२०

"तुमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती कोण ?"

               "तुमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती कोण ?"



आपल्या जीवनातला अविभाज्य घटक म्हणजे आपलं कुटुंब. आपलं घर हसत खेळत रहावं अशी  प्रत्येकाची अपेक्षा असते. आपण जर लहान गोष्टी लक्षात घेतल्या तर हे सहज शक्य आहे
माझ्या वाचनात नुकताच ऐक लेख आला तो मला खुप आवडला आज मी त्याविषयी  लिहिते...
कुटुंब व्यवस्थेवर ऐक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं तिथे वक्त्यानी ऐक प्रश्न विचारला
"तुमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती कोण??"
 बरेच जणांचं उत्तर आलं की, आमची मुलं आमच्या घरात महत्वाचे आहेत. आमची मुलं ही आमच्यासाठी सर्वस्व आहेत म्हणून आमच्या कुटुंबात पहिलं स्थान हे मुलांना आहे.
वक्ता थोडावेळ गप्प झाला व बोलला चुकीच्या व्यक्तीला तुम्ही हे स्थान दिलं आहे. तुमच्या घरात सर्वोच्च स्थान हे घरातील ज्येष्ठ व्यक्तीच असायला हवं तुम्ही लहान मुलांना नको ते स्थान देऊन तुम्ही तुमचं व तुमच्या लहान मुलांचं नुकसान करत आहात.
आपण लहान होतो त्यावेळी आपल्या घरातील आजोबांचं, वडिलांचं स्थान उच्च होतं. त्यावेळी त्यांनी घेतलेले निर्णय अंतिम असत. प्रथम जेवणाचा किंवा एखादी गोष्ट हाताळण्याचा मान या लोकांचा असायचा. हे एकप्रकारचे संस्कार आपल्यावर झाले आहेत पण आता परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत मै बडा तू बडा  करत कोणीच कोणाचं ऐकत नाही. प्रत्येकाने एकमेकांचा मान ठेवला तर मान वाढतो व आदर निर्माण होतो.
आपण आपल्या घरात आपल्या ज्येष्ठ व्यक्तीना महत्त्वाच्या जागी दिली तर मुलांना तीच सवय लागेल. आपल्यालाही त्यांच्याकडून अनुभवाचे धडे घेता येतात व कुटुंबात शांतता, समाधान टिकून राहते अश्याच घरात लक्ष्मी वास्तव्य करते.
चला तर मग आज पासून ठरवू की घरातील ज्येष्ठ व्यक्ती आमच्या घराचा आत्मा आहेत..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template