आज जगासमोर कोरोनाचं एक भलं मोठा संकट उभं आहे . या आजाराने सगळ्यांची तोंड बंद केली आहेत . बाहेर जाण्याचे रस्ते पूर्ण बंद झाली आहेत. सर्वाना नाईलाजाने घरी बसावं लागत आहे. आता शाळेला सुट्टी जाहीर झाली त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन दूर झालं. परीक्षा आली,परीक्षा आली असा कांगावा करणाऱ्या आम्हा पालकांना सुखद धक्का बसला का दुःखद बसला तोच कळत नाही कारण मुलांच्या सतत मागे लागण्याचा विषयच संपला , आता मुलांना कशात गुंतवायच हे एक भलं मोठं संकट उभं आहे
सुट्टी म्हणजे मुव्ही , मॉल , बाहेर फिरायला जाणे हेच हल्ली आपलं गणित झालं आहे. घरी बसून काय करायचे असा प्रश्न आपल्या समोर पडला आहे काहीच नाही म्हणजे मोबाईल तर असतोच पण मुलांना घाबरून तो पण घेता येत नाही कारण आपण मोबाइलला घेतला तर त्यांना पण द्यावा लागतो ,टीव्ही वर सतत त्याच त्या बातम्या ऐकून कंटाळा आला आता करायचे काय असा सर्वांसमोर प्रश्न उभा आहे. टाईमपास काय करायचा याचं उत्तर शोधात शोधात मला काही गोष्टी आठवल्या कि आपण बऱ्याच दिवसात या केल्याचा नाहीत म्हणून काल संध्याकाळी मुलासोबत बसून लुडो खेळत होतो त्यावेळी लक्षात आलं कि या एक तासात आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो , खूप हसलो ,मज्जा आली . एकत्र बसून खेळण्यातून एक वेगळाच आनंद मिळाला.कदाचित तुम्हाला या गोष्टी क्षुलक वाटतील पण तुम्ही करून बघा व याचा अनुभव घ्या .
आपल्या मध्ये व आपल्या मुलांमध्ये सतत संवाद हा फक्त अभ्यासाचाच होतो, हे कर -ते कर , अस नको करू तसं कर हे खा- ते खा असाच असतो . जेंव्हा आपण असे खेळ खेळतो त्या वेळी आपल्या मुलांचे सुप्त गुण दिसून येतील . खेळ खेळताना मुलांची निर्णय क्षमता, जिंकण्याची जिद्द ,स्वतःच्या बळावर जिंकण्याचा आनंद , अजून कितीतरी छान - छान गोष्टी दिसून येतील .या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या सोबत बसून खेळणे महत्वाचे आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment