अंबरनाथ लायन्स क्लब व ग्रंथाभिसरण मंडळ यांच्या सहकार्याने " श्यामची आई , आचार्य अत्रे आणि मी "या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वक्ते होते श्यामची आई या पहिल्या राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या चित्रपटातील श्याम म्हणजेच माधव वझे . या दोन तासात श्याम नि म्हणजेच माधव सरानी खूप सुंदर चित्रपटाचा प्रवास सांगितला व आचार्य अत्रे यांच व्यक्ती दर्शन घडवून आणलं .
श्यामची आई या चित्रपटातील श्याम म्हणजे आपल्या समोर आठ वर्षाचा छोटासा श्याम येतो , पण हा श्याम आता खूप मोठा झाला आहे वयाची सत्तरी पार केली आहे पण विचारांनी व संस्कारानी त्यांच्यातला श्याम जशाचा तसा भासला . काळ बदलतो त्याप्रमाणे पिढी बदलते , त्याच्या गरजा बदलतात , राहणीमान बदलतं पण संस्कार व विचार तेच राहतात हे खरे .
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साणे गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशारितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला.
श्याम वरती प्रसंगानुसार झालेले संस्कार साने गुरुजींनी खूप सुंदर शब्दात श्यामची आई या पुस्तकात लिहिले आहेत पण आपली इच्छा असतानाही आपण हे पुस्तक वाचू शकत नाही कधी वेळ कमी पडतो किंवा इतर काही कारण असू शकतं . हि गरज ओळखून मी यातल्या मला जमतील तेव्हड्या गोष्टी मुलांना समजतील अशा भाषेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे . मुलांना यातील गोष्टी नक्की वाचायला द्या ..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment