श्यामची आई - मुकी फुले
लहानपणी श्यामला व त्यांच्या वडिलांना फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. रोज शाळा सुटल्यावर श्याम व त्याचे मित्र सर्वजण फुले वेचावयास जात असत . पाटीदप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी श्यामला एकसुध्दा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी श्याम ने निश्चय केला की, आज आपण सारी फुले आणावयाची. लौकर जाऊन कळयाच तोडून आणावयाच्या असे ठरविले व फुले फूलू लागण्याच्या आधीच श्यामने सर्व फुले तोडून आणली व आनंदानी आई समोर ठेवली त्यावेळी श्यामच्या आई ला खूप वाईट वाटले व खूप सुंदर शब्दात श्यामला समज दिली
आई श्याम ला म्हणाली, 'श्याम! दुस-याच्या घरची फुले त्यांना न सांगता-सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी; परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास; परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फु लू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळया किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळयांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच कळया चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील. इतरांच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना? कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे; परंतु नीट फुललेले वहा.'
किती छान शब्दात माउलीने समज दिली. हि शिकवन फक्त ऐका प्रसंगापुरती मर्यादित नाही जगात कसं वागावं याचा उत्तम उदाहरण आहे . अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment