मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, १९ मार्च, २०२०

स्वावलंबनाची शिकवण

      श्याम लहान असताना त्याला छोटी मोठी संस्कृतची स्तोत्र येत असत पण त्याला रामरक्षा येत नव्हती . श्यामच्या शेजारी भास्कर नावाचा त्याचा मित्र होता   त्याच्याकडे  पुस्तक आहे  म्हणून त्याला रामरक्षा येते  असे  श्यामचे म्हणणे  होते  . तो मुद्दामच परवचा, स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच श्यामकडे  येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे श्यामला जास्तच चीड येई. हा आपणांस मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो, असे पाहून तो  फार संतापे.
    एके दिवशी भास्कर रामरक्षा येत नाही म्हणून चिडवत होता  .   श्याम त्याच्यावर चिडला ते आईने पाहिलं   व श्यामच्या  चिडण्याच कारण  ही आईला कळलं 
आई म्हणाली, "मला रामरक्षा येते व तुला येत नाही, असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो.  "भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा. नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर."
आईने सांगितले त्याप्रमाणे  श्यामने पूर्ण  पुस्तक  सुंदर अक्षरात लिहून काढलं  व पाठही केलं . पण आईने आपल्याला रागवले म्हणून श्यामने ती वही आपल्या आईला दाखवली नव्हती जेंव्हा रामरक्षा पूर्ण पाठ झाली त्या वेळी श्याम आई कडे गेला त्या वेळी  श्यामची आई श्याम ला समजावण्याच्या स्वरात  बोलली 
,"वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील, तितके कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे, याचा आनंद आईला किती होत असेल?  पुस्तक नाही, म्हणून रडत बसला असता, तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय, डोळे सारे आहे. स्वतःच्या पायांवर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे." 

आपण नेहमी आपल्या भोवती असणारांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो, तर आपणाला राग येत असतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे, असे पाहून आपण दुःखी होतो.  आपल्याकडे एखादी गोष्ट नाही म्हणून रडत बसण्यात  काहीच अर्थ नाही ती गोष्ट कशी मिळवता येईल याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे . समोरच्या व्यक्तीचे बोलणे , चिडवणे  सकारात्मक कसे घ्यावे  याचे उत्तम उदाहरण  आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template