घर म्हणजे नक्की काय असतं हे मी खऱ्या अर्थाने दोन वेळा अनुभवलं आहे . १९९३ साली किल्लारी येथे भूकंप झाला त्यावेळी म्हणजे २७ वर्षांपूर्वी . माझं गाव लातुर जिल्ह्यातलं त्यामुळे आम्हालाही भूकंपाची झळ पोहचली होती. भूकंप हा शब्द काढताच सर्व आठवणी बाहेर येतात व अजूनही भीती वाटते .
भूकंप व कोरोना यामध्ये घर हा शब्द कॉमन आहे फरक इतकाच आहे कि भूकंपात घर सोडावं लागलं होतं तर कोरोना मध्ये घर पकडावं लागलं . घर सोडताना व घराला बिलगताना घराची खरी किंमत कळते . घरामध्ये एक अदभूत शक्ती असते बिलगताना व विलग होताना सतत आपल्या सोबत असते .
घर म्हणजे नेमकं काय ?
दोन अक्षरांचा शब्द का चार भिंती त्यावरचं छत असतं असं नव्हे तर घर म्हणजे जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं . जीवन जगताना अन्न , वस्त्र महत्वाचे आहे तेवढाच निवाराही महत्वाचा आहे .
हा आपला निवारा , आपलं घर कसं असावं
आचार विचार हि घराची आखणी असावी ,प्रेम हा घराचा पाया असावा ,थोर माणसे घराच्या भिंती असाव्यात . सुख हे घराचे छत असावे . जिव्हाळा हा घराचा कळस असावा ,माणुसकी हि घराची तिजोरी असावी ,शांतता हि घराची लक्ष्मी असावी ,पैसा हा घराचा पाहुणा असावा तेथे समाधान हे सुख असते व अशा घरातच ईश्वराची जागृत मूर्ती असते .
आपल्या घरातील ईश्वराची जागृत मूर्ती पाहायची असेल तर घरात बसून करमत नाही म्हणण्यापेक्षा घराच्या खूप जवळ येण्याची संधी मिळाली आहे , संधीचं सोन करा व घराला कोंडवाडा म्हणण्यापेक्षा घराला प्रेमाने जवळ करा ,घर रुपी ईश्वर तुमचा प्रेमाने सांभाळ करेल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment