मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोना व चिडचिड

गेल्या पांच सहा दिवसापासून आपण घरी बसून आहोत पाहिले दोन  तीन दिवस खुप छान गेले ,दिवसभर बाहेर असणाऱ्या लोकांसाठी तर ही सुवर्ण संधीच होती त्यांना तर मज्जाच  वाटत होती  . जसे जसे दिवस जात आहेत तसे आपण चिडचिडे होत चाललो  आहोत . हा चिडचिडे पणा  का येतोय व याचा आपल्या  मुलांवर काय  परिणाम होतोय तो पाहू ..
  पुरुष मंडळींना घरी बसण्याची अजिबात सवय नाही त्यामुळे दोन  दिवस मजेत गेले  भलेही वर्क फ्रॉम होम करत असतील पण ऑफिस  मधला फील येत नाही  त्यामुळे  चिडचिड . ज्या महिला वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांची पण तीच अवस्था घर पण बघा ,मुलांना सांभाळा व ऑफिस च काम पण करा . ज्या गृहिणी आहेत त्याची तर तारेवरची कसरत चालू आहे म्हणून चिडचिड  . हा जो तरुण वर्ग आहे तो कामात व्यस्त आहे पण मुले व म्हातारी माणसे यात भरडली चालली आहेत  कारण त्यांच्याकडे वेळच  वेळ आहे  म्हणून  हा वर्ग चिडचिड झाला आहे खरी आधाराची गरच या लोकांना आहे .
आपण सतत व्हाट्स  अँप , फेसबुक , टीव्ही  वरती  त्याच  त्या  बातम्या ऐकत आहोत .  त्यामुळे आपण खूप  टेन्शन  मध्ये  वावरत  आहोत , काय  कराव सुचत  नाही , भीतीचा सावट  सतत आपल्या घरी वावरत  आहे . जी किशोरवयीन मुलं आहेत आहेत त्याना सध्या आपण कुठल्या परिस्थितीतून चाललो आहोत याची कल्पना आहे आपल्या पालकांची अशी अवस्था पाहून ते जास्तच घाबरले आहेत . जी लहान मुले आहेत त्यांना काय चालू आहे ते कळत नाही  ते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा हट्ट करत आहेत . या सर्व गोष्टींमुळे  आपण चिडचिड  करत आहोत , लहान सहान  गोष्टींमुळे आपापसात  भांडण ,अबोला होत आहे . या गोष्टींचा प्रत्येक्ष व अप्रतेक्ष परिणाम मुलांवरती व वृद्धांवरती होत आहे .
 हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळणे गरजेच्या आहेत  जसे  व्हाट्सएप  वरती कोरोना संदर्भातला मेसेज पाठवायचा नाही  व वाचायचा पण नाही . परिस्थितीचा गांभीर्य प्रत्येकाच्या लक्षात  आल आहे . खबरदारीचे उपाय  सरकारकडून  सुचवले जात आहेत  त्याच पालन करू बातम्या दिवसातून दोन ते तीन वेळा पहायच्या.आपण आपल्या घरी सुरक्षित आहोत पण जे घरापासून दूर आहेत , ज्यांना हक्काचा निवारा नाही यांचा विचार आपण करू व आलेल्या परिस्थितीवर   हसत हसत मार्ग   काढू..  

1 टिप्पणी:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template