सर्व प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . हे नवीन वर्ष तुम्हाला व तुमच्या परिवाराला आरोग्यदायी जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना .
काल रात्री आपल्या पंतप्रधानांनी जेंव्हा पुढचे २१ दिवस लॉकडाऊन आहेत असं जाहीर केल त्यावेळी पायाखालची जमीनच सरकली . परिस्थिती कंट्रोल मध्ये करण्यासाठी हे करणं गरजेचं होत त्यामुळे त्यानी केलं पण आता आम्ही काय करायच हा खूप मोठा प्रश्न उभा आहे . आपण ३१ तारखेच टार्गेट (due date ) समजून ऐक ऐक दिवस ढकलत होतो पण आता एवढ्या दिवसाचं काय करायचं.. ?
मला वाटत अशी परिस्थिती मागच्या शंभर वर्षात तरी कोणावरती आली नसावी म्हणजे आजच्या प्रत्येक पिढीला हा अनुभव नवीनच आहे त्यामुळे याची नोंद इतिहासात केली जाईल यात शंकाच नाही. आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला आपल्याला दाखवून द्याचं आहे कि , आम्ही एवढ्या कठीण प्रसंगातून मार्ग काढला व हे एकवीस दिवस संस्मरणीय वाटले आम्हाला. या एकवीस दिवसात आपल्याला वेळेचा सुदुपयोग करायचा आहे .
आपण या एकवीस दिवसात काय करणार आहोत याची ऐक नोंदवही आपल्याला करायची आहे . आज गुढी पाडावा नवीन वर्षाची सुरुवात . या दिवशी आपण वहीवरती शेवटच्या पानावर आपण या एकवीस दिवसात काय करणार आहोत ते लिहून ठेवू . अगदी त्यात पुस्तक वाचन , घरातली काही काम , चित्रपट पाहणं , स्तोत्र पाठ , पोथी वाचन ,अजून काही गोष्टी तुमच्या मनात आहेत त्याची नोंद करा .
प्रत्येक दिवशी रात्री तुम्ही आजचा दिवस कसा घालवला याची नोंद लिहायची आहे. अगदी तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. आपल्याला आपल्या वहीत नोंद करायची आहे त्यामुळे आपण काहीतरी चांगली आपल्याला आवडणारी कामे नक्की करू यात शंका नाही. आपण या वहीत खोटं लिहणार नाही कारण आपण कधीच स्वतः ला फसवत नाही . रोज असे ऐक अध्याय लिहीत गेलो तर एकवीस अध्याय कसे पूर्ण होतील आपल्यालाही कळणार नाही.
एकवीस अध्याय पूर्ण झाल्यावर आपल्याला लक्षात येईल कि कितीतरी कामं आपण या दिवसात पूर्ण केले कि जे एव्हड्या वर्षात आपल्याला शक्य झाले नाहीत व कदाचित पुढेही शक्य होणार नव्हते . या दिवसातला प्रत्येक क्षण आपण वसूल करू . अशी वही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही बनवू शकता . हा आपला आठवणींचा खजिना आज पासून लिहायला चालू करू व हे एकवीस अध्याय सफळ संपूर्ण करू ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment