ग्रुप चा कार्यक्रम - एक सुंदर अनुभव
आजचा ब्लॉग हा खास मनोहर कला महिला मंडळातल्या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी..
कालच भूमिका ग्रुप चा धडाकेबाज कार्यक्रम झाला व त्याच्यानंतर प्रत्येकीच्या डोळ्यात वाचलेले भाव शब्दात उतरवण्याचा प्रयत्न मी या लेखातून करणार आहे.
मनोहर कला महिला मंडळ चालू होऊन आता चार वर्ष पूर्ण होतील . मंडळ जरी चार वर्षाचं झालं असलं तरी सर्वानी चाळीसपट प्रगती केली आहे हे नक्की. या चार वर्षात आपली सर्वांची एवढी प्रगती झाली आहे कि मागच्या दहा वर्षात झाली नसेल. हे कालच्या कार्यक्रमावरून लक्षात आले .
शैक्षणिक वर्ष जसं जून मध्ये चालू होतं वर्षभर अभ्यास केला जातो व सर्व प्रगती दोन - तीन तासाच्या परीक्षेत उतरवली जाते त्याप्रमाणे आमच्या मंडळात आम्ही आठवड्यातून एक तास जातो जेव्हढं शिकता येईल तेव्हढं शिकतो व झालेली प्रगती एक तासाच्या ग्रुप प्रोग्रॅम मध्ये दाखवून देतो.
ग्रुप प्रोग्रामसाठी प्रत्येक ग्रुप ने कसून तयारी केली असते काहीतरी नवीन सादर करायचं असा ध्यास प्रत्येक मेंबर कडे असतो ,एकमेकांमध्ये सुंदर बॉण्डिंग असतं, ज्याला जे जमतं ती जबाबदारी पार पाडत एक सुंदर कार्यक्रम तयार होतो. कार्यक्रम होण्यापूर्वी कसा होईल चा ध्यास घेतलेले रात्र रात्र न झोपलेले डोळे पण कार्यक्रम झाल्या नंतर समाधानाने प्रेक्षकांकडे पाहणारे डोळे आम्ही काल अनुभवले .कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते. सुंदर कार्यक्रम होण्यात प्रत्येकीचा वाटा असतो .प्रत्येकीचं वेळेचं गणित जमवून ,विषयाला धरून , एकही पैसे खर्च न करता कार्यक्रम करणे हि काही साधी सुधी गोष्ट नाही पण एकमेकींच्या साथीने ती पूर्ण होते .
ग्रुप चा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकीला घर व मंडळ यामध्ये तारेवरची कसरत करावी लागते पण स्वतःला कितीही त्रास झाला तरी कार्यक्रम छान झाला पाहिजे हे एकच ध्येय समोर ठेऊन प्रयत्न करतो व छान कार्यक्रम करून दाखवतो . कार्यक्रमाची तालीम ते कार्यक्रमाचा दिवस हा जो काळ असतो तो फार महत्वाचा असतो कारण एकमेकां मध्ये खूप छान बॉण्डिंग तयार होतं , नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात व मैत्रीची गाठ पक्की होते .
सुशिक्षित तरुण मुलींची गरज ओळखून त्यांना एकत्र करून त्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे काम संध्या मॅडम नि केले त्याबद्दल आम्हा सर्वांनकडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद .
Nice
उत्तर द्याहटवा