आपण हल्ली आजूबाजूला बघतो,ऐकतो , वर्तमानपत्रात वाचतो आत्महत्येसारख्या
बातम्या सतत कानावर येत आहेत. यात बहुतेक तरुण वर्गाचा समावेश जास्त प्रमाणात आहे.अश्या बातम्या ऐकून मन सुन्न होतं, थोडे दिवस या विषयावर चर्चा होते व आपण काही दिवसांनी
हा विषय विसरून जातो.
या विषयाचा गांभीर्यानी विचार केला व या समस्येच्या मुळाशी गेले तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि "संवादाची कमतरता
" हे यामागच
खरं कारण आहे.
आजची विभक्त कुटुंब पद्धती व समाज माध्यमाचा अतिवापर त्यामुळे
संवाद कमी होत आहे. फेसबुक,व्हाट्सअँप मुळे लोकांना आपण जोडले गेलो आहोत पण हा हवा
तसा संवाद होत नाही. चॅटिंग,कॉलिंग हे सगळं वरच्यावर चालू आहे यात नुसता पोकळपणा आहे
गरजेचा असा संवादच होत नाही.
गरजेचा असा संवाद कोणासोबत
करायचा हा प्रश्न उभा राहतो.आपल्या काही अश्या अडचणी असतात कि त्या आपण ऐका
विशिष्ट व्यक्तीसोबत बोलू शकत नाही . आपल्या समस्येनुसार आपल्याला निवड करावी
लागते. समस्या म्हणजे खूप गंभीर गोष्टीच असायला हव्यात असं नाही आपल्या दैनंदिन आयष्यात
आपल्याला कंटाळा येतो , निराश वाटत, या स्पर्धेच्या युगातून बाहेर फेकलो चाललो आहोत
का असं वाटत यातून आपण कोणाशी व कसा संवाद साधू शकतो या विषयावर माझ्या ब्लॉग मध्ये आपण चर्चा करू शकतो . तुमच्याकडे पण काही उपाय असतील
तर नक्की कंमेंट मध्ये सांगा आपणं रोजच्या
दैनंदिन समस्ये पासून ते मोठ्या अडचणींवर हसत
- हसत मजेशीर उपाय शोधू
मनात माझ्या या आपल्या ब्लॉग ला नक्की भेट द्या व चर्चेत सामील
व्हा ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment