संवाद - मैत्री
मैत्री हे एक
असं नातं आहे
कि आपण आपलं
मन मोकळं
करू शकतो खरा
संवाद या नात्यामध्ये
घडू शकतो. बऱ्याच
अडचणीतून आपण मैत्रीच्या
माध्यमातून मार्ग काढू शकतो.
ज्याच्या कडे अशी
जीवश्च कण्ठश्य मित्र किंवा
मैत्रीण आहे तो
खरा भाग्यवान.
मी
डोळे बंद केले
व माझी
जवळची अशी मैत्रीण
शोधू लागले .( तुम्ही
हि हा प्रयोग
करू शकता )
माझी अशी जिवलग
मैत्रीण कोण ? याचं उत्तर
शोधता - शोधता खूप
नावं समोर आली
कि मला त्यांची
वर्गवारी करावी लागली .
माझ्या काही मैत्रिणी
आहेत त्यांच्याकडे बघून
मी हसते ,हाय-
बाय करते ,त्यांचं
नावं हि मला
माहित नसतं पण
त्यांचा उल्लेख मी मैत्रीण
असाच करते .
माझ्या काही मैत्रिणी
अशा आहेत कि
त्यांच्या सोबत
हसते - बोलते आमच्या छान
गप्पा होतात पण आमच्या
वैयक्तिक आयुष्यात काय
चाललं आहे ,आम्ही
कुठे राहतो हे
सुद्धा आम्हाला माहित
नसत तरी पण त्यांचा
उल्लेख मी मैत्रीण
असाच करते .
काही मैत्रिणी अशा आहेत
कि त्यांच्यात व
माझ्यात छान शेरिंग
आहे . मी
कुठे अडली कि
त्यांना विचारते , आम्ही एकमेकींना
छान प्रोत्साहन देतो
या माझ्या जवळच्या
मैत्रिणी आहेत पण
जिवलग नाही
एवढ्या साऱ्या मैत्रिणींचा
गोतावळा माझ्या कडे आहे
पण या मैत्रिणींशी
मी अगदी पर्सनल
मधल्या पर्सनल गोष्टी शेअर
करत नाही . कारण
मला भीती वाटते
कि माझ्या वरती हसतील , कोणाला
तरी सांगतील . मग अशा
वेळी आपलं मन
मोकळं होतच नाही
नाजूक गोष्टी मनातल्या
मनात साठून राहतात.
जिवलग मैत्रिणींचा शोध घेता
घेता मला माझी
जिवाभावाची मैत्रीण सापडली .हि
मैत्रीण दुसरी तिसरी कोणी
नसून माझ्या मनात
लपलेली मी स्वतः
आहे . टीव्ही सीरिअल
मध्ये दाखवतात ना
अगदी तसं..माझी
प्रतिकृती - माझं मन
.
माझं मन
एकांतात माझ्या समोर येत व
मैत्रिणींसारख्या छान गप्पा
गोष्टी करतं. मी या
माझ्या मैत्रिणीपासून काहीही लपवू शकत
नाही .माझ्या सुखाच्या
व दुःखाच्या प्रत्येक
क्षणात माझी मैत्रीण
माझ्या सोबत असते
. मी चुकले कि माझं
कान पकडते व
प्रसंगी शाबासकीची थापही देते
.गरजेच्या वेळी सतत
धावून येते . मी
माझ्या आत्म्याशी मैत्री केली
आहे हीच माझी
खरी जिवलग मैत्रीण ,संवाद साधण्याचा
मुख्य स्रोत .
तुम्हाला भलेही खूप
मित्र मैत्रिणी असतील
पण पहिली मैत्री
तुम्ही स्वतःशी करा बघा
कशी मजा येते.आपल्या अडचणी या
मैत्रिणी समोर मांडायच्या
तीच आपल्याला सकारात्मक
मार्ग दाखवेल त्यामुळे
मन हलकं होतं
व ताण कमी
होण्यास नक्की मदत होते
..
It's very true ..
उत्तर द्याहटवा