आजकाल Whatsapp सर्वजण वापरत आहेत . कोणाच्याही मोबाईल मध्ये इतर कोणत्या अँप्स च्या अगोदर Whatsapp अँप इन्स्टॉल असतेच. आपण रोज व्हाट्सअप चा वापर करतो, आपल्या घरच्यांना, मित्रमैत्रिणींना मेसेजस पाठवतो.
आपल्याला काही गोष्टी हव्या असतात तर काही नको असतात त्या कश्या बदलायच्या हे माहित नसतात त्या आपण आज जाणून घेऊ
WhatsApp मध्ये जेव्हा तुम्ही एखादा मेसेज वाचता तेव्हा तिथे Blue Tic येते. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्याचा मेसेज वाचला आहे, हे कळू द्याच नसेल तर तुम्हाला हि सोप्पी ट्रिक कामी पडू शकते. तुम्हाला फक्त एक सोप्पी गोष्ट करायची आहे ती म्हणजे, व्हाट्सअँप च्या Setting मध्ये जा, नंतर Accounts मध्ये जा, त्यांनतर Privacy मध्ये जा आता तुम्हाला तेथे “Read Receipt” नावाचा Option दिसेल. त्या ऑप्शन समोर तुम्हाला एक Checkbox दिसेल त्यावर क्लिक करून Uncheck करा. आता तुम्ही एखाद्या व्यक्तीचा मेसेज वाचला असेल तरी त्याला कळणार नाही कि, तुम्ही तो मेसेज वाचला आहे. कारण, त्या मेसेजवर आता Blue Tic येन बंद झालेले असेल
तुम्ही ज्या व्यक्तीशी जास्त प्रमाणात बोलता, त्या व्यक्तीचे चॅट तुम्ही शॉर्टकट म्हणून तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ठेऊ शकता. तुम्हाला फक्त एक सोप्प काय करायचे आहे. त्या व्यक्तीच्या चॅटला जास्त वेळ प्रेस करून ठेवा त्यांनतर तिथे तुम्हाला उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतात त्यावर क्लिक करा, क्लिक केल्यांनतर तिथे “Add to Shortcuts” असा Option असतो, त्यावर क्लिक करा आणि आता त्या व्यक्तीचे चॅट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल. जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीचे चॅट डायरेक्ट उघडू शकता.
जर तुम्हाला तुमच्या गॅलरी मध्ये एखाद्या ग्रुपमध्ये आलेले फोटोज आणि व्हिडियोज नको असतील, तुम्ही हि ट्रिक वापरू शकता. त्या ग्रुपचे चॅट्स उघडा, त्यांनतर ग्रुपच्या INFO मध्ये जा, तिथे तुम्हाला Media Visibility वर क्लिक करा, तिथे तीन Option येतील Default, Yes आणि No तर तुम्ही नो वर क्लिक करा. आता तुमच्या गॅलरीमध्ये नको असलेले फोटोज किंवा व्हिडियोज सेव्ह होणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment