मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, १ एप्रिल, २०२०

पालकांची परिक्षा

मुलांना लागलेली भली मोठी सुट्टी , बाहेर जाण्यास मज्जाव ,त्यामुळे सर्वांचीच चिडचिड होत आहे . आज एक या  संदर्भातलं खूप सुंदर वाचन माझ्या वाचनात आल ते मी तुमच्यासमोर मांडते .

आई-बाप होणं हि ईश्वराकडून मिळालेली खूप मोठी देणगी आहे . निसर्गतः  मुलं लहानाची मोठी होतात पण खऱ्या अर्थानं  मुलांना लहान किंव्हा मोठ करण  हे आई - बापाच्या हातात असत . जगात मुलांना आई बापचं शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग , सारी सजीव -निर्जीव सृष्टी शिकवत असते ; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय  शिकावं  हे आईबापच शिकवू शकतात .आई देह देते व मनही देते . जन्मास देणारी तीच व ज्ञान देणारीही तीच . लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते ,मातीसारखे, मनासारखे असते , द्यावा तो आकार त्याला मिळेल .
मुलं  जेंव्हा बाल्यावस्थेत असतत् तेंव्हा आईने तेलकट खाल्ले कि बाळाला खोकला  होतो , आंब्याचा रस खाल्ला तर थंडी भरते त्याप्रमाणे आईने मुलांसमोर आदळआपट केली , भांडणतंडण केले त्याचा परिणाम मुलांवरती होतो . परंतु , काही वेळा  आई बाप  नकळत मुलांदेखत आदळआपट , भांडणं  करतात आपण केलेली कृती  कॉपी होतं आहे व ती  कुठेतरी पेस्ट नक्की होणार हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे .
 आई बापाचे बोलणे , चालणे,हसणेसावरणे म्हणजे मुलाच्या मनाचे , बुद्धीचे , हृदयाचे दूध होय . मुलांच्या समीप फार जपून वागावे . आई बापाचें कृत्ये जर स्वच्छ ,सतेज,अशी असतील तर मुलांचे मन कमळाप्रमाणे रसपूर्ण ,सुगंधी , रमणीय व पवित्र अशी फुलतील ; नाहीतर ती किडींनि खाल्लेली ,रोगट ,फिक्कट ,रंगहीन व पवित्रहीन अशी होतील.

  मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही . हा जो वेळ मुलांसोबत व्यतित  करायला मिळतोय  ती खरी आपली परीक्षा आहे  या परीक्षेत आपल्याला  यश मिळवाचे आहे कारण मुलांच भविष्य आपण आपल्या हाताने लिहीत आहोत हे लक्षात असू द्या ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template