मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

गाणं मनातलं - नको देवराया



संत-कवयित्री कान्होपात्रा ह्यांनी १५ व्या शतकात लिहिलेला हा अभंग. १९६५ च्या साधी माणसे चित्रपटासाठी हे गाणे लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या स्वरात संगीतबद्ध झाले. गाण्याच्या गीतकार ह्या लता मंगेशकर होत्या .
महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची संपन्न  परंपरा  लाभली  आहे . या थोर संतांनी  वेळोवेळी  जनतेला संकटसमयी मार्गच दाखवला आहे . या अभंगात  संत कान्होपात्रा यांची अगतिकता शब्दा  शब्दातून जाणवते . एखाद्या सामर्थशाली  शक्तीने दुबळ्या शक्तीवर प्रहार  करावा त्यावेळी भगवंताकडे दिलेली हाक या अभंगातून दसून येते
या अभंगाची ,गाण्याची  आठवण  आपल्याला संकट समयी आल्या शिवाय राहत नाही . आजच हे कोरोनाचं  संकट आपल्या समोर आ वासून उभे  आहे पुढे काय  होणार  माहित नाही . अशा संकटसमयी आम्ही आमच्यापरीने लढत आहोत पण देवा आता आमचा अंत बघू नको , आम्हाला यातून सोडव ज्या लोकांचं  हातावरच पोट  आहे ,एका  खोलीत दहा - दहा  माणसं  राहतात त्यांना तर जीव नकोस झाला आहे .
या कष्ट करणाऱ्या हाताला काम हवं आहे , देवा आम्हला आता वाचवं आमचा अंत पाहू नको अशी आर्त  हाक सर्वजण घालीत आहेत . 

 नको देवराया, अंत आता पाहू ।
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे ॥१॥

हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥२॥

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी विठाबाई ॥३॥

मोकलूनी आस, जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥४॥



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template