मी अकरावी किंवा बारावीला असताना हिंदी मध्ये एक कविता होती ,कवितेचे नाव व कवी आठवत नाहीत पण कवितेतलं एक वाक्य मला आजच्या परिस्थितीत आठवलं "चिंता चिता के समान होती हैं . "
चिता जशी शरीराला जाळते तशी चिंता मनाला जाळते.
भीती आणि चिंता या दोन्ही परस्पर पूरक मानवी भावना आहेत. आपण एखाद्या गोष्टीचा सामना करण्यास हतबल ठरलो कि भीती वाटते व त्याच रूपांतर चिंतेत होतं . डोळ्याला दिसू न शकणार विषाणू आपल्या मनात घर करून बसला आहे हीच ती भीती जी आपले मन पोखरत आहे.. आपल्या कुटुंबाची चिंता, आप्तेष्टांबद्दल चिंता, शेजाऱ्यांबद्दल चिंता, पुढच्या पिढीच्या भविष्याबद्दल चिंता, आपल्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल चिंता..
आणि शेवटी संपूर्ण मानवजातीबद्दल चिंता करून करून हे मन थकून गेले आहे.. भले ह्या लॉक डाऊनच्या काळात आपापले मन रिझवायला आपण कित्येक मजेदार गोष्टी करत आहोत.. पण तरीही मनामध्ये ती सुप्त भीती घर करून बसली आहेच..
ह्या भीती पोटी आपण सगळे काही अंशी विचित्रही वागतो आहे.. कोणाच्या घरात प्रचंड भांडणे होत आहेत तर कोणी मृत्यूच्या भयाने एकलकोंडा होतो आहे. कोणी आपला रोग लपवून ठेवत आहे तर कोणी नुसत्याच भीतीने खंगत आहे.कोरोनामुळे येणाऱ्या काळात आर्थिक बाजू सावरणं कसं जमेल याचीही चिंता खूप जणांना छळायला लागली आहे.
घराच्या खिडकीतून बाहेर डोकावतो त्या वेळी बाहेर पडणाऱ्या लोकांचा राग येतो व वाटतं या लोकांना भीती कशी वाटत नाही . मनात प्रश्न येतो घरात कुडत बसणारे आपण हि लढाई लढत आहोत का बाहेर बिनधास्त फिरणारे लोक शूर वीर न घाबरता भीतीचा सामना करत आहेत ...?
शेवटी कोण बरॊबर ते काळच ठरवेल . ..
मेंदू वरचा ताण आपल्यासाठी चांगला नाही..!! वर वर हसतमुख असलात तरी आत पोखरणारी चिंता थोडी दूर केली पाहिजे..
जसे वर आनंदी आहात तसे मनापासून आनंदी राहणे आता सध्या गरजेचे आहे.. तुमच्यावर तुमचे कुटुंबीय अवलंबून असतील तर त्यांच्या आनंदासाठी का होईना तुम्ही टेन्शन फ्री असणे खूप महत्वाचे आहे..
शेवटी कोण बरॊबर ते काळच ठरवेल . ..
मेंदू वरचा ताण आपल्यासाठी चांगला नाही..!! वर वर हसतमुख असलात तरी आत पोखरणारी चिंता थोडी दूर केली पाहिजे..
जसे वर आनंदी आहात तसे मनापासून आनंदी राहणे आता सध्या गरजेचे आहे.. तुमच्यावर तुमचे कुटुंबीय अवलंबून असतील तर त्यांच्या आनंदासाठी का होईना तुम्ही टेन्शन फ्री असणे खूप महत्वाचे आहे..
यातून सुटण्याचा उपाय म्हणजे तुम्हाला वाटणारी चिंता एक कागदावर लिहून काढा व तो कागद फाडून फेकून द्या , हा उपाय जरी वरवरचा व हास्यास्पद वाटत असला तरी करून बघा नक्की फायदा होईल ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment