आजकालच्या परिस्थितीला बघून मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली . आमचा एक खेळ होता एखादा प्रश्न विचारला कि विचार न करता पटापट उत्तर द्याचं त्यात माझ्या भावाने मला प्रश्न विचारला " खाण्यासाठी जगतेस कि जगण्यासाठी खातेस " विचार न करता मी उत्तर दिल " खाण्यासाठी जगते " माझ उत्तर ऐकून सर्वजण हसायला लागले , मला चिडवायला लागले लहान होते त्यामुळे मला त्याचा अर्थ कळला नव्हता पण अपमान झाला ,सर्वजण हसले म्हणून खूप वाईट वाटले. खूप वर्ष लोटून गेले पण हि आठवण अजून लक्षात आहे .
या आजकालच्या परिस्थितीत हा प्रश्न सर्वाना विचारावासा वाटतो . जगण्यासाठी खाता कि खाण्यासाठी जगता ?
माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न , वस्त्र , निवारा . या सर्व गोष्टी असतील तर आपण जगू शकतो मग बाहेर पडण्याचा आटापिटा कशाला . रोज दोन भाज्यांच्या ऐवजी एक भाजी खा , थोडे दिवस भाजी नाही खाली तर विशेष फरक पडणार नाही , कोथिंबिरी शिवाय पण जेवण बनवता येत . शक्य असतील तेवढ्या गोष्टी टाळायला शिका . थोडे दिवस जिभेवर कंट्रोल करा , संयम पाळा . प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते ती वेळ गरजेप्रमाणे वापरली तर त्या वेळेचं सोन होईल नाहीतर सर्व मातीमोल होऊन जाईल . प्रत्येकानी हा प्रश्न स्वतःला विचारू व घरीच सुरक्षित राहू ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment