मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, १ मे, २०२०

भारतीय जीवनपद्धती आणि कोरोना

                                       
 भारतीय जीवनपद्धती आणि कोरोना  या विषयवार निबंध स्पर्धा होती त्यावेळी केलेला छोटासा प्रयत्न.

      सध्या आपण जगभरातल्या बातम्यांचा आढावा दूरदर्शन व इतर प्रसार माध्यमातून घेत असतो . तिथे सध्या चाललेली परिस्थिती आपण व्हिडीओ किंवा फोटो च्या स्वरूपात पाहतो त्यावेळी अंगावर अक्षरशः काटा येतो .  भारता मध्ये  या देशांच्या तुलनेत अधिक लोकसंख्या आहे ,  भारत  तुलनेनी  कमी विकसित आहे  तरी  कोरोनाचा प्रसार  आपल्या  कडे  कमी कसा  असा प्रश्न उभा राहतो याचं  उत्तर शोधताना भारतीय जीवनपद्धती हि आदर्श जीवनपद्धती आहे असा माझा निष्कर्ष आहे . तो कसा ते पाहू ..
वेद व उपनिषिदे हि भारताला मिळालेली खूप मोठी देणगी आहे . वेद  म्हणजे सर्व ज्ञानाचं मूळ , यामध्ये आयुर्वेद , योग अभ्यास  याचा उपयोग तर दैनंदिन जीवनात भारतीय लोक करून घेतात मानवाचे  वर्तन कसे असावे याची शिकवण  आपल्याला यातूनच मिळते याच्या अनुषंगाने लोक वर्तन करत असतात  व हीच आपली जीवनपद्धती झाली आहे . याचा खूप मोठा फायदा या कोरोनाशी संघर्ष करताना होत आहे .
     भारतामधले जवळ जवळ ८० ते ९० टक्के लोक श्रद्धाळू आहेत . त्यांची  आपापल्या देवावर नितांत श्रद्धा आहे त्यामुळे  भारतीय लोक आपण यातून नक्की सुटणार असा दृढ विश्वास ठेवूनच चालत आहेत. मानसिक संतुलन स्थिर असणं हि या वेळची  जमेची बाजू  आहे व ती  सांभाळून लोक कार्यरत आहेत .माणूस मनाने  खंबीर असेल तर त्याला शरीरही  साथ देते हेच खरे आहे .
 भारतीय जीवनपद्धती जरी पुरुषप्रधान असली तरी स्त्री ही  घरचा कणा आहे .  कुटूंबाला  आनंदी ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी ती  या काळात सांभाळत आहे. भारतीय लोकांच्या आहारामध्ये सात्विक जेवणाचा समावेश असतो . आज  बाहेर सर्व काही बंद  असलं  तरी भारतीय लोक घरातच विविध प्रकारच्या  पदार्थाचा आस्वाद घेत आहेत व आपली प्रकृती स्वास्थ  टिकून आहेत .
 भारतीय जीवनपद्धती  मध्ये संस्काराला खूप जास्त महत्व आहे वर्षातल्या प्रत्येक  दिवसाला व दिवसातल्या प्रत्येक क्षणाला  विशेष महत्व आहे . आमचा दिनक्रम हा सूर्याच्या उगवण्यापासून ते मावळण्यापर्यंत ठरलेला असतो . इतर देशाप्रमाणे कधीही उठा कधीही झोपा  असा नसतो त्यामुळे या कोरोनाच्या काळातही आम्ही भारतीय आमचा समतोल राखून आहोत .
 स्वच्छतेच्या बाबतीत  भारतीय उदासीन असतात अशी निंदा सगळीकडे ऐकायला मिळते पण हे अर्धसत्य आहे कारण आम्ही स्वतःच्या स्वच्छतेच्या बाबतीत जागृत असतो .  आम्ही दररोज आंघोळ करतो , स्वच्छ  धुतलेले कपडे परिधान करतो . हात - पाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश करत नाही . कुठल्याही व्यक्तीच्या जवळ कारणाशिवाय  जात नाही . नेहमी अंतर ठेवूनच असतो . आम्ही  हस्तांदोलना  च्या  ऐवजी नमस्काराला  महत्व देतो
सकारात्मक विचार , दूरदृष्टी , नियोजित दिनक्रम , संयम व  दयाळू वृत्ती  हि भारतीय जीवनपद्धतीची  खासियत आहे त्यामुळे कोरोना सारख्या संकटातून आम्ही भारतीय लवकरात लवकर बाहेर पडू असा  दृढ निश्चय करून वाटचाल करत आहोत .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template