मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, ३ मे, २०२०

हास्य दिनानिमित्य

रामायण व महाभारताचा खूप मोठा प्रभाव या लॉकडाऊनच्या काळात  माझ्यावरती झाला . सकाळ-संध्याकाळ रामायण व घरात बंदिस्त त्यामुळे आपण त्या युगात गेलो असा भास होतो . असाच एक प्रसंग ..
रात्री झोपले होते . कुठूनतरी जोरजोरात हसण्याचा आवाज आला , आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही , हातात लगेच धनुष्यबाण घेतला , मंत्र पुटपुटले  एवढ्यात काटेरी शरीर असलेला , डोक्यावर मुकुट असलेला जीव समोर आला . त्याने त्याचा परिचय दिला . मी म्हटलं तुझ्यामुळे या जगाची गती मंदावली आहे , लोक हातात जीव घेऊन वावरत आहेत आणि  तू हसतोस असं म्हणून मी धनुष्याला बाण लावला एवढ्यात तो बोलला ,' मी काय म्हणतो ते ऐकून घ्या मग मला मारा '. मी पण एक संधी त्याला दिली .
माझी निर्मिती ब्रहमदेवाने केली आहे . एके दिवशी वसुंधराताई आक्राळ - विक्राळ रूप घेऊन ब्रहमदेवाच्या  दरबारात  रडत आली . ब्रह्मदेवाला खूप राग आला तुझी अशी अवस्था कोणी केली असं विचारता  तिने तुमचे नाव सांगितले . या अतिशहाण्या मानवाने माझीच नव्हे तर माझ्या मांडीवर खेळणाऱ्या प्राणी , पशु, पक्षी व सर्व छोट्या जीवांची अशी  अवस्था केली आहे .ब्रहमदेवाने वसुंधरा  माईला वचन दिल कि तुझ्या या वाढदिवसादिनी तू पूर्वी सारखी सुंदर  दिसशील व अन्याय झालेले सजीव आनंदात राहतील . ब्रहमदेवाने  वचन तर दिलं पण या प्रगतशील मानवाला शह देणं कठीण  हे सर्व देवाने जाणलं होतं, त्याप्रमाणे खूप विचार करून माझी निर्मिती करण्यात आली . ज्या ठिकाणी वसुंधरामाई जास्त कुरूप झाली आहे त्या ठिकाणी म्हणजे चीन या देशात माझा जन्म झाला . ज्या ज्या ठिकाणी माझ्या माई ला त्रास झाला तिथे मी जातो व बदला घेतो .
मी म्हटलं आता आमची चूक आमच्या लक्षात आली आहे आता तू जा आम्ही परत अशी चूक करणार नाही . तो बोलला मलाही ब्रहम देवाने परत बोलावले आहे पण आता मी जाणार नाही कारण मला आता इथे खूप मज्जा येते . मी माझं साम्राज्य वाढवणार , सर्वाना मारणार व जगावरती राज्य करणार असं म्हणून जोरजोरात हसायला लागला . मला खूप राग आला एका हातानी त्याला पकडलं व जोर जोरात लाथा बुक्या मारल्या , कण्हत होता- रडत होता . तो जेवढ्या जोरात रडायचा तेव्हढ्याच जोरात मी त्याला मारायची . एवढ्यात माझ्या गालावर चापट बसली , गाल चोळत उठली तर दिसलं यजमान पोटभर लाथा बुक्या खाऊन  विव्हळत बसले   व मी स्वप्न आठवून गालातल्या गालात हसत  ..!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template