मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, ७ मे, २०२०

मी खूप भाग्यवान

सकाळी साफ-सफाई केली त्यामुळे  स्वयंपाकाला  उशीर झाला . उन्हाच्या वेळी गॅस समोर उभं  राहून काम करणे म्हणजे महादिव्य . मागच्या  दोन महिन्यापासून एकही  दिवसाची सुट्टी नाही सकाळ -दुपार -संध्याकाळ नुसतं काम अन कामाचंं चालू आहे.  "वैताग आला या कोरोनाचा",


 असं  म्हणत पंखा  लावून खिडकीबाहेर डोकावले .
    बाहेर एक पन्नास -साठ  वर्षाची बाई टोपलीत भाजी घेऊन विकत होती . मला खूप वाईट वाटलं , बिचारी एवढ्या उन्हात बसली आहे . मी घरी बसून काम करते तरी एवढी वैतागली आहे तिला बिचारीला काय  वाटतं  असेल असा विचार करत तिच्या मनात डोकावले  तर ती विचार करत होती , "मी किती भाग्यवान आहे मला आज  झाडाजवळची  जागा मिळाली म्हणून थोडी सावली तरी आहे  हे बिचारे काका  कलिंगडाचे  ओझे सायकलवर घेऊन उन्हातानात इकडे तिकडे फिरत आहेत " . माझी नजर त्या काकांकडे गेली तर ते काका खरंच भलं मोठं  ओझं  घेऊन घाम पुसत निघाले होते . बाजूलाच रस्त्याचं  काम चालू होतं म्हणून  सायकल थांबवली व  काका  विचार करू लागले  ,"माझं  काम किती छान आहे निदान थोडा वेळ सायकल थांबवून मी सावलीला शांतपणे बसू तरी शकतो हे बिचारे मजूर उन्हात तापलेल्या  दगडात  किती काम करत आहेत " .  
माझी नजर त्या काम करणाऱ्या लोकांकडे गेली खरंच ते खूप कष्टाचे काम भर उन्हात करत होते . त्यांच्याच  बाजूला काही लोक हातात पेपर घेऊन गर्दी करून उभे होते व पोलीस त्यांचावर लाठीवार  करत होते .  सर्वांची नजर पोलिसांपासून धावणाऱ्या  लोकांकडे  होती .   काम करणारे मजूर   या  वेळी काय  विचार करत असतील  म्हणून त्यांच्या मनात डोकावले तर ते देवाचे आभार मानत  होते , "देवा मला हे काम मिळवून दिलस म्हणून किती छान झालं निदान मी माझ्या कुटुंबाला दोन वेळचं  जेवण तरी देऊ शकतो  नाहीतर  मलाही  या लोकांसारख गावाला जाण्यासाठी मार खावा लागला असता  .
त्याचं वेळी आवाज करणारी एक रुग्णवाहिका ऐका रुग्णाला घेऊन जात होती . मार खाणारे ते लोक मनोमन देवाचे आभार मानत होते,' देवा, आम्हला सुदृढ व निरोगी शरीर दिलं आहे'.

  ही  माणसांची विचार करण्याची  साखळी मला 
खूप आवडली . माणसाला सुखी आयुष्य जगायचं असेल तर आपल्या पेक्षा कमी सोई सुविधा  असलेल्या  माणसांचा विचार करणे फार गरजेचे आहे . आपणही असाच विचार करू कि ," मी खूप भाग्यवान आहे  "  व आनंदाने  या संकटातून मार्ग काढू ... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template