मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, २६ जून, २०२०

कश्याला उद्याची बात ??

आता या  कामाच्या वेळी  कोण बर  फोन केला असेल असा विचार करत  मीरा ने फ़ोन उचलला , समोरून खुप हळू आवाज येत होता त्यामुळे मीरा ने जोरताच विचारले कोण आहे? समोरून आवाज आला ,'मीरा अग  मी लीना बोलतेय'. नेहमी खुश व उत्साही असणारी लीना आज निराश वाटत होती . पुढचे दहा -पंधरा मिनिटे मीरा फक्त ऐकून घेत होती व मध्येच समजावण्याच्या सुरात, " अगं  होईल ग सगळं व्यवस्थित , गप्प बस रडू नकोस "  सांगत होती . बाजूलाच मीराचा नवरा काळजी पोटी खुणेनी मीराला विचारत होता "काय  झालं ? "
मीरने पण खुणेनी सांगितलं काही नाही , सांगते तुम्हाला  पुढचे वीस मिनिट    असाच संवाद चालू होता . कसा बसा  मीरा ने फोन ठेवला तशी नवऱ्याची प्रश्नार्थक नजर हजर .
  "अहो , ती माझी  समोरच्या बिल्डिंग मधली मैत्रीण लीना आहे ना तिचा फोन होता बिचारी रडत होती , तिच्या मिस्टरांची  नोकरी गेली . खूप टेन्शन मध्ये आहे बिचारी . पैशांची मदत हवी आहे म्हणून फोन केला  होता ."
मीराचा  नवरा हसला , काहीच  बोलला नाही ,निघून गेला आतल्या खोलीत .

    या वेळी नवऱ्याच्या  हसण्याचा मीराला राग आला नाही पण या हसण्यातून त्याने बऱ्याच गोष्टी सांगून गेल्या होत्या आणि त्या खऱ्या हि होत्या .
लीना हि एक अतिशय खर्चिक व चैन करणारी बाई होती. प्रत्येक सणाला किंवा एखाद्या पार्टीला  तिचा  नवीन ड्रेस व ज्वेलरी   असायचीच . तोच तोच ड्रेस वापरायला तिला अजिबात आवडत नसे. प्रत्येक वीकेंडला हॉटेलिंग ठरलेलं , सुट्टीत परदेशवारी ठरलेली . मैत्रिणीत किती मान होता तिला, मागच्या वर्षी  घराचं इंटिरियर केले त्यावेळी तर तिने पाण्यासारखा  पैसा  खर्च  केला होता . मिराला बऱ्याच वेळा तिचा हेवा वाटायचा . 
एकदा मीराने  नवऱ्याला बोलून दाखवलं होत ," तुम्ही फक्त पैसा - पैसा करता, काही हौस नाही मौज नाही , काही आनंदच नाही आपल्या आयुष्यात."
 त्याच  वेळी त्याने तिला जे समजावून सांगितलं होतं त्याची आठवण आज मीराला झाली.
 
आपल्या घरी जो पैसा  येतो त्याच नियोजन कसं  करायचं , संकट समयी हेच पैसे ,सेविंग  आपल्याला  कसे उपयोगी येतील किती छान समजावून सांगितले होते पण  त्या वेळी मीराला  त्याच   पटलं  नव्हत . आता नाही तर पुढे घेऊन काय  करायचं , उद्या कोण पाहिला  आहे , खाओ पियो मज्जा करो हेच खरं  आहे हे सांगत नवऱ्यासोबत  तिने वाद घातला होता .
हा प्रसंग आठवून तिला  आज लज्जित झाल्यासारख वाटत होत.  आज तिला तिच्या आजोबाने  बोललेलं  वाक्य आठवलं ,' मी इतक कमावल आहे कि पुढच्या तीन पिढ्या बसून खातील .' पण लीना च्या केस कडे   बघून वाटत ,'आम्ही एवढ कमावतोय कि आमचीच पिढी  तीन महिने पण बसून खाऊ शकत नाही' .
आमचाच चंगळवाद आम्हाला किती भारी पडला आहे . उद्याचा विचार केलाच पाहिजे  हा   धडा   कोरोना ने आपल्याला शिकवला  आहे . असा विचार करत मीरा ने नवऱ्याला मनोमन थँक यु  म्हटले व कामाला  लागली






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template