आटपाट नगर होतं तिथे सुयश नावाचा हुशार , कर्तबगार तरुण आपल्या परीवारासोबत सुखाने राहत होता . त्याच्या हसऱ्या खेळत्या कुटुंबाला लागलेल्या ग्रहणाची हि कहाणी .
रागारागात शुभदा जाब विचारायला हॉल मध्ये आली तशी कमला ,शुभदाची सासू बेडरूम मध्ये पटकन गेली टॉवेल उचलला व दोरीवरती वाळत टाकला . कमलाला खूप अपराध्यासारखा वाटत होतं आपण आपल्या मुलाला शिस्त लावली नाही . आपण हि आपल्या मुलाचा बबड्याचं करून ठेवला आहे अस तिला हल्ली सतत वाटत होतं .
एव्हडे दिवस त्याच वागणं दोघीना कधी खटकलंच नाही पण हल्ली सुयशच वागणं दोघीनाही खटकत होतं . सुरुवातीला त्यानेपण हसत -खेळत घेतल पण नेहमीची यांची बोलणी त्याला कटकट वाटू लागली . सकाळी नाश्त्याला पोहे केले तर छोटया चिन्मयने खाण्यास नकार दिला , मला डोसा हवा आत्ताच्या आत्ता असा हट्टच धरून बसला त्याला कितीही समजावलं तरी पठ्या एकेच ना , म्हणतो कसा बघ ती आसावरी कशी लगेच बनवून देते तशी तू पण मला बनवून दे . अशाच छोट्या छोट्या कारणावरून सतत भांडण ,चिडचिड चालू होती .
कमलाहि खूप निराश असायची तिला वाटायचं आपण आपल्या मुलाला वाढवताना चूक केली . शुभदाला अस वाटायचं कि आपला मुलगा पण बबड्या होतं चालला आहे. काल त्याला पुस्तकाचं कपाट आवरायला सांगितलं तर म्हणतो कसा ," आई , आपणपण आपल्या घरी एक बॉय आणायचा का? तो पण माझे सर्व काम करून देईल . "
हसत - खेळत घराला भांडणाच , कटकटीच रूप आलं . सुयशला कळत नव्हत नेमक आपल्या घरी काय चालू आहे .
ऑफिसच काम आटपून सुयश घरी आला तर तिघे सिरीयल बघण्यात गढून गेले होते , सुयश आपल्या बाजूला येऊन बसलाय याच भानही त्यांना नव्हतं . अर्ध्या तासाचा भाग बघून झाल्यावर त्याच्या लक्षात आलं कि आपल्या घरात जो बदल झाला आहे त्याला हि सिरीयल कारणीभूत आहे .
एखाद्या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव माणसावर किती लवकर होतो . याच उत्तम उदाहरण म्हणजे सुयशच घर .
कमला आपल्या मुलाला अठ्ठावीस वर्षांपासून ओळखते किती प्रेमाने काळजी घ्यायचा , प्रत्येक गोष्ट आईला विचारून करत असे . शुभदाची काळजीही तो इतक्याच प्रेमाने घ्यायचा पण घर कामाच्या बाबतीत तो बेशिस्त होता , बऱ्याच गोष्टी त्याला हातात लागायच्या . अर्ध्या तासाचा भाग पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं कि , या दोघी बबड्याची बरोबरी माझ्या सोबत करून माझ्याशी भांडत असतात .
सिरीयल संपल्यावर सुयश जोर जोरात हसू लागला , या दोघीना काहीच कळत नव्हतं .
तुम्ही त्या बबड्याची बरोबरी माझ्या सोबत करून माझ्याशी भांडत असता काय , आज मला कळलं . दोघींचेही चेहरे बघण्यासारखे झाले होते .
टीव्ही सिरीयल त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकता पण आपण काय बघायचे ते आपल्या हातात आहे . अशा सीरिअल मुळे आपल्या नात्यात , घरात अंतर येणार असेल तर अशा गोष्टी बंद करनच योग्य आहे हे सर्व समजून सांगितल्यावर दोघीनाही त्याच बोलणं पटलं . दोघी तश्या हुशार व सुसंस्कृत होत्या पण या जाळयात कश्या अडकल्या कळलंच नाही . सोबत आपला छोटा चिन्मय अशी सिरीयल बघतो , त्यामुळे त्याच्यात झालेला बदल जाणवत होता तो चक्क बबड्याचं अनुकरण करत होता हे लक्षात येताच दोघींच्या पायाखालची जमीन सरकली . मागच्या काही दिवसातले असे किस्से आठवून तिघेही खूप दिवसानंतर खळखळून हसले .
नकारात्मक सीरियलचा प्रभाव सुयशच्या घरावरती झाला तसा तुमच्या आमच्या घरावरती नको होऊ दे हि साठाउत्तराची कहाणी सफळ संपूर्ण .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment