माझी मैत्रीण कविता हि एक खूप छान कवयत्री आहे तिच्या वाढदिवसापासून कविता करायला सुरुवात केली . माझ्या मंडळातल्या मैत्रिणीवर त्यांच्या रूप , गुण व स्वभावानुसार वाढदिवसानिमित्त केलेल्या कवितांचा संग्रह ...
१. कविता आदरवाड
१. आज कविताच वाढदिवस म्हणून मी तिच्यावर केलेली कविता ..
कविता आजची कविता फक्त तुझ्या करिता
तुझ्या स्वभावात आहे शीतलता, वाणीत आहे मधुरता, तुझ्या प्रत्येक शब्दात आहे कविता,
आज शब्दांची जुळवाजुळव कविता फक्त तुझ्या करिता.
कविता लिहिताना ठेवावं लागतं शब्दाचं भान, तुझ्या कविता वाचताना आमचं लागतं ध्यान,
तुझ्याकडे आहे शब्दांची खान,देवाने तुला दिलंय सुंदर शब्दाचं दान
कविता आजची कविता फक्त तुझ्या करिता
तुझ्या कवितेचा प्रवास असाच बहरू दे ,अशी ईश्वर चरणी इच्छा
तुला वाढिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐 ३०/७
2.शिल्पा औटी
मंडळात झाली मैत्री,नाटकात झाली सासू व नणंद तिच्या सोबत रहायला मला होतो आनंद. म्हणूनच मी तिचा सोडत नाही पिच्छा , शिल्पा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🍬🍫🥧
३ अमृता ऋषी
नावाप्रमाणे तुझी वाणीआहे अमृतापेक्षा गोड
तुझ्या उत्साहाला कधीच नसते तोड
वेळात वेळ काढून जोपासतेस तुझे छंद
म्हणूनच मंडळाशी जुळला मैत्रीचा बंध
तुझा जास्तीत जास्त वेळ आम्हाला मिळो अशी मनोमन आहे इच्छा
अमृता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🍫🌹 १४/८
४.स्वाती कुळकर्णी २१/८
आज तुझ्या वाढदिवसदिनी घेऊन आले औक्षवणाच ताट,
शब्दारुपी फुलांनी करणार आहे तुझा थाट.
हास्याची कारंजी, उत्साहाची भरती, अशीच आहे माझी मैत्रीण स्वाती.
मुलीच्या प्रगतीची वाटचाल दिसते तिच्या डोळ्यात, स्वतःचे स्वप्न बघते मुलीच्या रूपात.
सतत नवीन करण्याचा असतो तिचा ध्यास,
तुझ्या प्रगतीचा असाच दरवळू दे सुवास.
तुझे सर्व स्वप्न पुरे होवो ही ईश्वरचरणी मागते इच्छा
maवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा💐🌹🍫
५ सुनीता खैरनार
६ अलका तळपदे
. सुनीता ताई , तुमच्या सोबत बोलण्याचा कधी जुळून आला नाही क्षण,
पण तुमच्या सुंदर व्हॉट्सअँप मेसेज नी भरून येतं मन.
अलका ,तुझ्यासोबत वेळ घालवता मला होतो आनंद,
तुझ्या शांत चेहर्यासोबत दरवळतो बुद्धिमत्तेचा गंध .
तुमiच्या दोघींच्या सुंदर रूपामध्ये आहे एक हळवं मन,
तुमची सतत भरभराट होहो ही इच्छा मनोमन.
मैत्रीला नसते भेटण्या बोलण्याचे बंधन,
कमलांकितच्या वास्तूत
आपण असच फुलवू मैत्रीचं नंदनवन.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अशी मागते मनोमन इच्छा तुम्हा दोघींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
💐💐🍫🍫 ६/९
७रोहिणी ठाकरे
दिलदार स्वभावाची आमची मैत्रीण रोहिणी
नृत्य व अभिनयाची आमच्यावर मोहिनी
तुझे भजन ऐकताना मन होते प्रसन्न
तू तर आहेस सर्व गुण संपन्न
वेळेचं कारण सांगून करू नकोस आमच्याकडे पाठ
तुझ्या शिठीची आम्ही पाहतो वाट, तुझ्याशिवाय कोण करेल आमचा थाट.😀
तुझीt सतत लाभू दे प्रेमळ साथ ,कायम राहू दे मैत्रीचा हाथ🤝
तुझी कायम भरभराट होहों ही ईश्वरचरणी मागते इच्छा , तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..💐 ९/९
८ गौरी मानकामे
हसरी,गोरी,उत्साही म्हटलं की , डोळ्यासमोर उभी राहते गौरी
तिची प्रत्येक गोष्ट असते भारी.
खोटेपणाचा आणत नाही आव,
जशास तसे वागणे हाच तिचा स्वभाव.
r
प्रत्येकाशी बोलताना ठेवते शब्दाचं भान
प्रत्येकाला देते ज्याचा त्याचा मान
नेहमीच लक्षात राहील तिचं अध्यक्ष पदाच स्थान .
गौरी,तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी सदिच्छा , तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ३/९
९ हेमांगी पुरी
. शांत, सुस्वभावी माझी मैत्रीण हेमांगी
iनाना गुणांची खान तिच्या अंगी
तुझ्या बायो डेटा मधून समजली तुझ्या गुणांची कदर
मला नेहमी वाटेल तुझ्या विषयी आदर
कायम लक्षात राहील सासू सुनानी रंगवलेला मंगळागौरी चा खेळ
त्यातून दिसून आला तू तयार केलेल्या आनंदी नात्याचा मेळ
अशीच हसत खेळत रहा हीच ईश्वरचरणी सदिच्छा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐 ९ /९
n
१०साधना चौधरी
. 🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातली ऐक माझी मैत्रीण साधना …
जिच्या कडून मिळते सतत पुढे जाण्याची प्रेरणा..
साiधना म्हणजे सुप्त गुणांची खान,
तिला असतं नेहमी वेळेचं भान..
साधनाच्या जिभेवर असते साखरेची गोडी,
ऐकामेकाना जपणारी आहे नवरा बायकोची आदर्श जोडी
आयुष्यातली सगळी सुखं तुला मिळू दे ही ईश्वराकडून मागते इच्छा..
साधना तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
🎂🎂🎂 ३०/९
११ वंदना.पवार
९. प्रेम सुंदर असतं कारण ते हृदयाची काळजी घेते पण
मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण मैत्री दुसऱ्यांच्या हृदयाची काळजी घेते..अशीच
माझी मैत्रीण वंदना..💓💞
वंदना तुझ्या बोलण्यात, वागण्यात, हसण्यात आहे बालिशपण..
तुझ्या सहवासात आम्हाला आठवत आमचं लहानपण..
तुझ्यात मस्ती करण्याचा गुण आहे खास
आम्हाला होतो कॉलेज मध्ये असल्याचा भास
तू सोबत असताना उसळतात हास्याच्या लाटा
आमचं हृदय प्रसन्न करण्यात तुझा असतो मोलाचा वाटा💕
तू अशीच सतत हसत रहा ही ईश्वर चरणी इच्छा
वंदना तुला वाढदिसानिमित्त खूप शुभेच्छा💐 २/१०
१२ माधुरी जवळकर
माधुरी नावाप्रमाणे तुझं बोलणं मधुर आहे..
सौंदर्या पेक्षा सुंदर तुझं दिसणं आहे..
तूcझ्या नावाचा उल्लेख जेंव्हा होतो माधुरी..
तेंव्हा डोळ्यासमोर उभी रहाते घोड्यावर बसलेली तुझी प्रतिमा गोजिरी..
तूझ्या प्रत्येक वेष भूषेत आहे खास बात..
स्कर्टमधली माधुरी ते नववारी माधुरी अजूनही आहे लक्षात..
तूझ्या सोबत बोलताना होतो आपलेपणाचा भास..
केठेही भेट झाली तरी आवर्जून बोलण्याचा तुझा गुण आहे खास..
माधुरी तू अशीच सतत प्रसन्न, हसत - खेळत रहा ही ईश्वर चरणी इच्छा तुला वाhढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎉
💐 ९/१०
१३ मनीषा खराडे
११. चेहर्यावर हास्य असणारी,
डोळ्यात आपलेपणा दर्शवणारी, यातूनच संवाद साधणारी
तुझी व माझी मैत्री..
आपल्या मंडळातील उंच, सुंदर मैत्रीण असा उल्लेख होताच डोळ्यासमोर राहते उभी
मनीषा तुझी सुंदर छबी,
तुझा पावसाळ्यातला डान्स होता खूप खास..
साक्षात वणराणी उभी असल्याचा झाला भास..
मुलीच्या कर्तुत्वाने होत असेल तुझा नेहमी सन्मान..
माझ्या मैत्रिणीची मुलगी असं सांगताना मला वाटतो खूप अभिमान..
तूझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होहो, उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी सदिच्छा
मनीषा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💞 १३/१०
y१४ सखी शीतल
ही सखी शितल कोण??
असा प्रश्न कोणाला पडणारच नाही..
तरीही आपल्याच मैत्रिणीची नव्याने ओळख तिच्या वाढदिवसादिनी...
मैत्री जोडणारी, टिकवणारी, नावासमोर सखी लावून हक्काने मैत्री करणारी,
ती माझी मैत्रीण सखी शितल..
महोदया,
जaन्मदिनस्य हार्दाः शुभाशयः।
देव वाणीतून शुभेच्छांचा वर्षाव करणारी,
ती सखी शितल..
आपल्या छोट्याशा मुलाला सैन्यात भरती करण्याचे स्वप्न
पाहणारी,
ती सखी शितल..
आपण समाजाचं देणं लागतो असा विचार करून गरजू लोकांना मदत करणारी..
ती सखी शितल..
गणपत पाटील हे नाव समोर येताच डोळ्यांसमोर उभी राहणारी..
ती सखी शितल..
जिजाऊचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन, मुलावर संस्कार करणारी..
ती सखी शितल..
जीवनाचा खडतर प्रवास ,आव्हान म्हणून स्वीकारणारी ..
ती माझी मैत्रीण सखी शितल..
गुणांची खान पण किंचितही अभिमान नसणाऱ्या माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ❤️
१५/१०
वरील कवितेवर आलेला शितलचा अभिप्राय
*प्रिय सखे कृतिका,*
*सुंदर रचतेस शब्दलतिका।।१।।*
*स्फटिकरुप लाभे क्षुल्लक या मृत्तिका,*
*मन आनंदून नाचे जणू स्वर्गाची नर्तिका।।२।।*
*हर्ष जाहला मनी या शीतल चंद्रिका*
*प्रिये, तू तर आमुची सद्गुण दर्शिका।।३।।*
🥰🥰🥰
१५ सारिका जगताप
सारिका या शब्दाचा अर्थ आहे सुंदरता, मधुरता..
आज या शब्दाला सुचला नवीन अर्थ निर्मळता..
ओठात व पोटात एकच भाव असणारी निर्मळ , सरळ, हसऱ्या स्वभावाची माझी मैत्रीण सारिका..
सारिका, किस्से रंगवून सांगण्याचा तुझा गुण आहे खास..
ऐकताना होतो आम्हाला त्या प्रसंगाचा भास..
वडा पाव बार्गणींग चा किस्सा झकास..
मैत्री जपताना ठेवतेस सर्वांचा सारखा मान..
तुझ्या सोबत सेल्फिचा प्रत्येकीला मिळतो सन्मान..
मेकअप करताना कृत्रिम रंगासोबात भरतेस प्रेमाचा, आत्मविश्वासाचा रंग..
म्हणूनच तुझा मेकअप बघून होतात सर्वजण दंग..
छंदाच रूपांतर व्यवसायात करून दिलास कुटुंबाला भक्कम आधार..
आज तुझ्या सारख्या हसऱ्या, खेळत्या, कर्तृत्ववान स्त्रीचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली म्हणून देवीचे मानते आभार..
अशीच सतत हसत रहा, तुझ्या व्यवसायात यशस्वी हो , खूप खूप प्रगती कर हीच आज दुर्गा चरणी सदिच्छा..
सारिका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..💐🍫 १७/१०
१६ अर्पिता बंडावर
इंद्रधनुचे सातही रंग जीला बघून लाजावेत इतकी सुंदर आहे माझी मैत्रीण अर्पिता
जिच्या बोलण्यात गोडवा,
तिच्या वागण्यात नम्रता.
अशीच गोड आहे
माझी मैत्रीण अर्पिता..
उशीर झाला तरी , वेळात वेळ काढून लावते मंडळाला हजेरी
रंग रुपा सह आहे स्वभावाने गोजिरी..
शिक्षिकेच्या भूमिकेतून उघडलं आहे तू ज्ञानच भांडार
दूर केला आहे कितीतरी लोकांच्या जीवनातला अंधार
तू अशीच प्रत्येक भूमिकेत फुलत, बहरत रहा ही ईश्वर चरणी प्रार्थना
अर्पिता तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..💐🍫💓
१७/१८ उत्तरा व अश्विनी
प्रिय मैत्रीण उत्तरा व अश्विनी तुम्हा दोघीना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . आज तुमच्या वाढदिवसादिनी मला तुमच्यावर कविता करायची होती पण माझ्या वैयक्तिक कारणांनी मला ते जमलं नाही, पण मी आज खास हे पत्र तुमच्यासाठी लिहीत आहे ..
उत्तरा तुझी आणि माझी ओळख मागच्या वर्षी झाली व आपल्या भेटी खूप कमी झाल्या पण या तुरळक भेटीतूनही तू मला खूप जवळची मैत्रीण वाटलिस. तुझ्या बोलण्यात , वागण्यात खूप आपलेपणा आहे तुझ्या या गुणामुळे तू सर्वाना आपलंसं करतेस . तुझं हे प्रेम, आपलेपणा सतत आम्हाला मिळो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते .
अश्विनी , तू तर माझी परदेशातली रूममेट , तुझ्या सोबत मॉरिशस चा प्रवास खूपच छान व संस्मरणीय झाला .मॉरिशस चे पाच दिवस खूप मज्जा केली , भरपूर फोटो काढलो, खूप गप्पा झाल्या . तुझ्या मुळे मला नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या . तुझ्यातला एक खूप चांगला गुण म्हणजे तू मनापासून सर्वांचं कौतुक करतेस , तुझ्या रिप्लाय ची सर्वजण मनापासून वाट पाहतात . तू हि खूप प्रगती कर व इतरांना अशीच प्रोत्साहन देत राहा ..
तुम्ही दोघीही खूप हुशार आहेत , उच्च शिक्षित आहेत तरी दोघीनाही अजिबात गर्व नाही हे विशेष. आपल्या मनोहर कला महिला मंडळाच्या तुम्ही दोघी रत्न आहेत .तुम्ही संधी मिळेल तशी खूप खूप प्रगती करा,तुमची सतत भरभराट होहो हि ईश्वर चरणी प्रार्थना , तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
१९स्वाती वेदक
जीवनात नाती तशी अनेक असतात,
पण ती जपणारी खूप कमी असतात..
अशीच ऐक कविता ऐकाच व्यक्तीची पण विणलेल्या वेगवेगळया नात्याची...
कधी भासते वहिनी
घालते प्रेमाची मोहिनी..
आहे सख्खी शेजारी...
गरजेच्या वेळी लावते हजेरी..
कधी भासते मोठी बहीण ..
भरते प्रेमाची वीण..
पण आहे खास जिवाभावाची मैत्रीण...
निभावते ही सर्व नाती..
ती आहे स्वाती..
प्रत्येकाच्या सुख दुःखात नेहमी असते हजर..
पण करत नाही कधी प्रेमाचा गजर..
मुलींच्या संस्कारात आहे तिचा मोलाचा वाटा
अशाच बहरतील मुलींच्या उत्कर्षाच्या लाटा
स्वच्छता व नीटनेटकेपणाचा गुण आहे खास
वेळेत काम पूर्ण करण्याचा असतो तिला ध्यास
रूपाने व गुणाने गृहलक्ष्मी शोभते
म्हणून तिच्या संसारात सुख शांती व समाधान नांदते
सतत अशीच हसत खेळत रहा ही ईश्वर चरणी इच्छा
स्वाती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐
२०आशाताई
आशाताई, तुमचा व माझा बोलण्याचा कधी आला नाही योग
आज वाढदिवसादिनी करणार आहे तुमच्या परिचयाचा प्रयोग..
तुमच्या नावातच आहे आशा..
तुमच्याकडून होत नसेल कोणाची निराशा..
मोहमपूरम ग्रुप मध्ये शोभून दिसतो शांत व समाधानी चेहरा खास..
प्रत्येकीला होत असेल तुम्ही सतत जवळ असल्याचा भास..
संवादाला नसते भाषेचे बंधन
असच फुलत राहो मैत्रीचे नंदनवन..
माझ्याकडून झाली असेल तुम्हाला ओळखण्यात भूल..
हातात घेवून फुल हे फुल
सांभाळून घ्यावी माझी चूक भूल..
तुम्हाला सुखी ,निरोगी दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा.
आशाताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
21 अनिता आदक
सर्व अधिकार असूनही जिच्या कडे आहे नम्रता
ती माझी कर्तव्यदक्ष मैत्रीण अनिता
भरलेल्या सभेत भूषवते मानाच स्थान
ती माझी मैत्रीण सांगताना मला वाटतो अभिमान
सतत हसत खेळत सर्वात सामील होण्याचा गुण खास
तिच्यामध्ये होतो मला सरस्वतीचा भास
22.
शब्द ही कमी पडतात जिचे गुण गाता..
अशी सगुनाची खान आहे अनिता
उदंड व निरोगी आयुष्य तुला लाभो ही ईश्वर चरणी इच्छा
अनिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
22. सुप्रिया बेहरे..
जिच्या नावात आहे सुप्रिया व साधना या दोन शब्दांचे मिलन..
तिच्या सानिध्यात येणाऱ्याचे आनंदी असते जीवन..
किती तुझा उत्साह आणि किती तुझ्या दिशा..
सगळे कसे मांडणार शब्दातून थोड्याशा..
आनंदाने व प्रेमाने जपतेस नाते सर्व..
डॉक्टर ची बायको व आई असूनही नाही तुला गर्व..
तू इतकी उत्साही जसा खळाळता झरा..
तुझ्या प्रत्येक शब्दातून बरसतो आपुलकीचा, जिव्हाळ्याचा वारा..
मला तरी पडतात शब्द फारच थोडे...
तुझ्या वाढदिवशी बोलताना तुझ्यावर गडे..
तू अशीच बहरत, फुलत, हसत रहा ही ईश्वर चरणी सदिच्छा सुप्रिया,
साधना, पार्थची मम्मी...तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा..
💐💐💐🍫🍫🍫
23.वैष्णवी गाडगीळ
आज आमच्या फॅशन डिझायनर मैत्रिणीचा वाढदिवस आहे खास..
जिची स्माईल असते नेहमी झकास..
कितीही घाईत असली तरी ओठा वर असतं हसू व हातात देते हात..
हीच तर तिच्या बुटिकची आहे खास बात..
आमची वैष्णवी म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा ..
आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....... तूझ्या सर्व इच्छा, आकांक्षा उंच- उंच भरारी घेऊ दे,
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत, मनात आमच्या फक्त एकच इच्छा
वैष्णवी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
24.निधी.
आमच्या मैत्रीच्या रिंगणात कळलंच नाही जोडली गेली कधी..
अशीच मन जोडणारी, प्रेमळ आमची मैत्रीण निधी..
नवीन लग्न करून आली नवीन घरात..
प्रेमाची , मैत्रीची जागा केली आमच्या मनात..
नवीन नवरी म्हणून केली चेष्टा, मस्करी तरी आला नाही हिला राग..
उलट स्मितहास्य करून प्रेम, मैत्री करायला लावलं भाग..
घरातली सर्व प्रेमाने सांभाळता नाती..
प्रेमाने पकडलास आमचा हात हाती..
अशीच सतत प्रेम दे, प्रेम घे..प्रेमाचा कर भरपूर साठा..
तूझ्या आयुष्यात येऊ दे आनंदाच्या लाठा..
निधी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💓💓💐💐
25 प्रियंका
सर्वांना मोहून घेते अशी जिची काया
अशीच मोहक आहे आमची मैत्रीण प्रिया..
निखळत्या पाण्यातील प्रतिबिंबालाही तुझाच मोह जडावा
इतकी सुंदर आहेस तू
माझ्या कवितेतील परीने देखील तुझ्यावरच कविता करावी
इतकी सुंदर आहेस तू
एक अशी गोष्ट जीच्याकडे पहाताच एक वेगळीच अनुभूती येते....
एक अशी गोष्ट जीला फक्त पहातच रहावे .....
एक अशी गोष्ट जीचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात ...
अशीच प्रेमळ , सुंदर आहे आमची मैत्रीण प्रियांका..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..💐💐💐🌹🌹.
26 संजीवनी
कोणत्याही समस्येचं निवारण करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या संजीवनी वनस्पती सारखे गुण असणाऱ्या आमच्या लाडक्या संजीवनीचा आज वाढदिवस..
प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या संजीवनीचा आज वाढदिवस
रुबाबदार व्यक्तिमत्व असलेली,
कशालाही न घाबरणारी, सर्वांमध्ये मिळून राहणारी आमची मैत्रीण संजीवनीचा आज वाढदिवस..
आजच्या या खास दिनी तुला
सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो ही ईश्वरा कडे मागते सदिच्छा
संजीवनी तुला वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा🌹🌹💐💐🍫🎂🎂
27 स्मिता ..
मनोहर कला महिला मंडळांनी बांधलंय मैत्रीच्या सुंदर धाग्यात..
कधी न बोललेल्या, भेटलेल्या व्यक्तीला बांधलंय मैत्रीच्या सुंदर नात्यात..
स्मिता तुझं व माझं असच सुंदर मैत्रीच नातं
तुझी माझी मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा, तुझी माझी मैत्री म्हणजे संवाद डोळ्यांचा..
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणीचा, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे
स्मिता तुला आज खूप छान छान सरप्राइज मिळू दे..
स्मिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫🌹🌹
28 देवयानी चांदेकर
देवयानीचा वाढदिवस म्हणताच पडतो शुभेच्छांचा पाऊस...
सर्वांना असते तिला शुभेच्छा देण्याची हौस..
तिचा खरंच वाढदिवस आहे की नाही हे पाहण्याचे कोणालाही नसते भान..
कारण प्रत्येकीच्या हृदयात आहे तिला प्रेमाचं स्थान..
देवयानी म्हणजे मैत्रिणीला मैत्रिण जोडणारा दुवा..
तिचा प्रेमळ सहवास प्रत्येकीला असतो हवा ...
नृत्य व अभिनयाची आहे आवड..
संसार सांभाळून समाजसेवेला काढते सवड
सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा गुण आहे खास..
सतत हसत खेळत राहण्याचा गुण झकास..
देवयानी तू नेहमी अशीच
हसत खेळत, मैत्रिणी जोडत रहा ,
तुझ्या आयुष्यात सुख, समाधान,शांती, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी सदिच्छा
देवयानी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🌹💐💐
29 अर्चना
आज आमच्या सुगरण मैत्रिणीचा वाढदिवस खास..
तिने बनवलेल्या पदार्थाचा दरवळतो नेहमी सुवास..
तिच्या प्रत्येक पदार्थाला असते क्वालिटी..
समोसा, मोदक ही तर तिची स्पेशालिटी..
मदतीच्या वेळी नेहमी असतो हातात हात..
प्रत्येकीच्या सुख दुःखात असते तिची साथ..
तुझ्या आयुष्यात आनंदाचे खास क्षण येवो
तुझी नेहमी भरभराट होहों..
वाढदिवशी तुझ्या,ईश्वराकडून ही ऐक सदिच्छा..
अर्चना तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..💐💐🍫🍫💐💐
30 धनश्री
आज आमच्या लावणी सम्राज्ञी धनश्रीचा वाढदिवस आहे खास..
तिचा नृत्य आविष्कार पाहून होतो अप्सरा पृथ्वीवर अवतरल्याचा भास..
संगीताचा आवज ऐकताच तूझ्या
अंगात संचारतो डान्स..
तुझ्यासोबत जुगलबंदी चा कोणाला नसतो चान्स
समाजसेवा करण्याचे थोर तुझे विचार..
महाराष्ट्राची लोकधारेचा जगभरात होऊदे प्रचार..
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस तुला यश, ज्ञान देवो आणि तूझी किर्ती वृद्धिंगत होत जावो. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात कायम येत राहो.. आई जगदंबा तुला उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!
31 सुजाता
आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला मला लेट
पण माझ्या भावना तुझ्या मनापर्यंत पोहोचतील थेट..
सुजाता म्हणजे, सर्व गुणांची खान ..
मनोहर कला महिला मंडळाची शान..
सुजाता म्हणजे हक्कासाठी लढणार व्यासपीठ..
स्वतःचं ज्ञान इतरांना देणारं ज्ञानपीठ..
सुजाता म्हणजे उत्साह,
सुजाता म्हणजे स्वाभिमान,
सुजाता म्हणजे सासर व माहेरचा अभिमान ..
सुजाताच्या शब्दकोशात "नाही" या शब्दाला नाही थारा..
सुजाता म्हणजे सळसळता वारा
आज तुझ्या वाढदिवसादिनी तुला मिळालेल्या शुभेच्छा म्हणजे तुझ्या विषयी वाटणाऱ्या प्रेमाची पावती..
असे मनाला भावणारे, आनंदअश्रू येणारे प्रसंग तूझ्या आयुष्यात नेहमी येत राहो..
तू दिवसेंदिवस यशाची शिखरे गाठत राहो ही ईश्वर चरणी सदिच्छा सुजाता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️❤️💐💐🍫🍫🎂
32 वर्षा
जिचे रंग - रूप - फिगर - पाहता होतो सेलिब्रिटी असल्याचा भास
आज याच मैत्रिणीचा वाढदिवस आहे खास..
आमच्या मंडळाची पी टी उषा
आहे आमची धावपटू वर्षा
प्रत्येकीच्या भावना जपण्याकडे असते तिचे लक्ष
फिटनेसच्या बाबतीत नेहमीच असते दक्ष
सत्याची बाजू घेण्याचा खास तिचा स्वभाव
नृत्य करताना मोहून टाकतात तिच्या चेहऱ्यावरचे भाव
तू अशीच सतत हसत खेळत फुलत रहा हिच ईश्वरचरणी सदिच्छा वर्षा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐🍫🍫
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment