वाढदिवसादिनी माझ्या मैत्रिणीने माझ्यावर केलेल्या कविता
अश्विनी बचामवार
प्रिय कृतिका
सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
काही लोकांना प्रत्यक्ष भेटून ओळखण्याची गरजच नसते त्यांचे काम हीच त्यांची ओळख असते. तशीच आमच्या मंडळातील ही गोड, गुणी कृतिका. प्रत्यक्षात जरी आमची ओळख अजून झाली नसली तरी तिच्या कथा आणि कविता तिची ओळख करून देण्यास पुरेश्या आहेत. दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच किंबहूना त्याहीपेक्षा जास्त मनाने सुंदर असलेली ही मैत्रीण. मंडळात कोणत्याही मैत्रिणीचा वाढदिवस असो ही आपल्या खास शैलीत कविता करून तिला शुभेच्छा देणार. तिची कविता वाचतांना आपली आपल्यालाच नवी ओळख होते आणि सेलिब्रिटी वाली फिलिंग येऊन वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला असे वाटते. प्रत्येकीचे गुण हेरून शब्दांचे योग्य यमक साधत ती कविता करते हे खरंच कौतुकास्पद आहे.
उच्चद्याविभूषित असलेली कृतिका वैदिक मॅथ्स, सुंदर हस्ताक्षर, रुबिक्स साॅल्व्ह इ. चे क्लासेस घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्यही करते.
कोविड काळात आपल्याच मंडळातील मैत्रिणींना तिने केलेली मदत तिचे संवेदनशील मन आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती दाखवते.
या सगळ्यांसोबत ती एक उत्तम लेखीकासुद्धा आहे. READKRUTIKA.BLOGSPOT.COM या तिच्या blogspot वर तिने लोहीलेल्या मोजक्याच पण दर्जेदार कथा वाचायला मिळतील.अशी ही multi talented, हुशार, प्रज्ञावान मुलगी माझी मैत्रीण आहे याचा खरोखर मला अभिमान आहे.
कृतिका मी काही तुझ्यासारखी शीघ्र कवयित्री नाही किंवा मला माझ्या भावना कवितेद्वारा व्यक्त करता येत नाहीत पण माझे मनोगत मी छोट्याश्या गद्य स्वरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
आजच्या या गोड दिनी ईश्वराकडे एकच प्रार्थना आमच्या या गोड, निरागस, अवखळ मैत्रिणीला निरोगी दीर्घायुष्य लाभो. तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होवोत.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ
सखी शीतल हिने माझ्यावर केलेली खास कविता
वाढदिवस प्रत्येकीचा, स्वतःसाठी असतो सण
आनंदाने, उत्साहाने साजरा करिती सगळेजण ।।१।।
या सगळ्यांचे भरभरून जी कौतुक करते फार
चला सख्यांनो, आज कृतिकेला शुभेच्छा देऊ अपार ।।२।।
सुखसमृध्दी सौभाग्य लाभो, ईश्वर चरणी हीच प्रार्थना
पूर्ण होवो सद्इच्छा, आणि तुझ्या सद्कामना ।।३।।
सून लाडकी सासूची अन्मुलाला लावते वळण छान
नितीनरावांचे ......👩❤️👨😷कुळकर्ण्यांची वाढवली शान ।।४।।
मराठंमोळं सोज्वळ रूप, त्याला स्मितहास्याची असते झालर
रूबिक क्यूब, वैदिक गणित शिकवून,कित्येकांना केले स्कॉलर ।।५।।
खास रचून कविता, प्रत्येकीच्या वाढदिवशी
खूश करते आम्हाला, मैत्रिणी असो वा मावशी ।।६।।
सगळ्यांविषयी कसं लिहू शकते?,विचार येतो मनी
कारण या गृपवर तर आम्ही शंभर जणी ।।७।।
तिच्या कवितेची प्रत्येकीला असते आस
आपल्यासाठी कृतिका आज काय लिहिणार खास ।।८।।
सरळ साध्या सोप्या भाषेत, वर्णन करते छान
अनोळखी ही परिचित व्हावी, वाचून हे गुणगान ।।९।।
शब्दरूपी ह्या तिच्या भावना ह्रदयी भिडती थेट
स्तुतीसुमनांची शब्दमाला, आमच्या तर्फे तुला सप्रेम भेट ।।१०।।
प्रिये,
जन्मदिनस्य हार्दाः शुभाशयः।
सखी माझी कृतिका😘 रातराणीच्या नाजुक फुलासारखी वा-याबरोबर डोलणा-या इवल्याशा रोपटयासारखी हसणं तिचं खळखळणा-या झ-यासारख आणि मनही तिचं त्यातील निम॔ळ पाण्यासारखं अशीच अश्रूसोबत हसणारी मनातील वादळाना मनातच थोपवणारी भासते कधी आकाशात चांदण्यासारखी🤩 तर कधी अथांग सागरासारखी माझ्या प्रेमळ सखीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐 wish u a happywala bday my smilie, rocking friend God bless u. Have a wonderful &rocking day n years a head.....Live long life.............................❤️❤️ u so much 😘
खास शुभेच्छा मोनिका वेदक
सरस्वती प्रसन्न आहे जिच्यावर, अलौकिक प्रतिभा आहे जीची अशी माझी सखी कृतीका....
सदैव हसतमुख मूर्ती आणि तेजस्वी तिची काया...
वेदिक गणिताची सम्राज्ञी ती तरी तसूभर गर्व नाही तयाचा....
अफाट पितृभक्ती तिची नाही अंत तयाला...
गणपती बाप्पा तुला प्रचंड यश देवो हीच माझी प्रार्थना...
तुझ्या जन्मदिनी याच माझ्या शुभेच्छा
इवलासा प्रयत्न कवितेचा तिच्या या सखीचा...🙏🙏🙏
काही शब्द योग्य नसल्यास क्षमस्व....
माझी मैत्रीण विदुला हिने केलेली कविता
कृतिका...
सगळ्यांच्या वाढदिवशी तु कविता केल्यास छान
तुझ्याकडे आहे सुंदर अशी शब्दांची खाण
तुझ्या कथा तुझ्या कविता मनाला भावतात
तुझ्या शब्दांना मनापर्यंत पोहचवतात
तुझ्या चेहर्यावर असते नेहमी गोड हास्य
अलगद तुझे डोळे देतात त्याची साक्ष
वेळात वेळ काढुन स्वताची आवड छंद जपतेस
सगळ्यांच्या मदतीला तयारच असतेस
डान्स नाटक करतेस काढुन सवड
लिखाणाची तर तुला भारी आवड
एक मैत्रिण म्हणुन तु प्रत्येकी साठी खास आहेस
घरासाठी तर तु घराची जान आहेस
आज तुझ्या वाढदिवशी हीच इच्छा
तुझ्या लेखणीला खुप खुप यश मिळो ही सदिच्छा
तुझ्या आयुष्याचा प्रवास असाच बहरत जावो
तुला उत्तम आरोग्य ऐश्वर्य लाभो
पुर्ण होवो तुझ्या सगळ्या आशा अपेक्षा
कृतिका तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...
कविता ने माझ्यावर केलेली कविता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment