माझी आई
माझ्या हस्ताक्षराच्या ग्रुप मध्ये ' माझी आई ' हा विषय लिहायला दिला होता .
मुलांना सांगितलं तुमची आई कशी आहे मला सात ते आठ वाक्यात लिहून सांगा . वाक्यरचना चुकली तरी चालेल पण अक्षर सुंदर हवं .
विषय दिला तसा माझ्या डोक्यात बालपणीचा ,शाळेत असताणाचा निबंध आठवला .
निबंधाची सुरुवात " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी " या वाक्याने ठरलेली .
निबंधाच्या नियमाप्रमाणे सुंदर सुंदर शब्द , वाक्यप्रचार ,म्हणी निबंधामध्ये टाकायचे ,निबंध सुंदर बनवायचा . त्या लेखनामध्ये निबंधच सुंदर बनायचा , माझी आई फक्त नावाला असायची .
आताच्या पिढीचा ,या लहान लहान मुलांचा निबंध पहिला तर असं जाणवल या मुलांनी , आई ला मुख्य स्थान दिलं होतं . भलेही माझी आई माझ्यासाठी हे करते ,ते करते असे शब्द होते पण स्वतःच्या हाताने सजवलेली आई मला खूप आवडली . एका मुलीने तर चक्क कबुली दिली , ' मला असं वाटायचं माझी आई काय बरं असं विशेष करते , पण निबंध लिहिताना कळलं कि माझी आई कितीतरी गोष्टी करते . याची मला कधी जाणीवही नव्हती '.
आई हा लेखनाचा विषय नसून ती एक जाणीव आहे . मापासून मनापर्यंत जुळलेला धागा आहे , जो कधीच दिसत नाही .
आई हि खरंच आई असते , आई काय असते हे दाखवून दिसत नाही ,ती अनुभवावी लागते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment