मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

सोमवार, १९ जुलै, २०२१

मैत्रीणीचा वाढदिवस - २


मोनिका  वेदक 

 जिच्या वाढदिवसाची आम्ही बघत होतो मनापासून वाट ,

तिच्या  साठी तयार केलं खास औक्षवनाचं ताट..

आज करणार आहे शब्दरूपी थाटमाट ..


मोनिका , तुझे प्रेम असे की, शब्दापेक्षा नजरेने कळणारे,

अशी तुझी मैत्री  की सावलीपेक्षा उन्हात सोबत करणारी

तुझ्याशी मैत्री म्हणजे सुखात व दुःखात साथ देणारी..



सासर माहेरचे  सर्व नाते जपणारी आहेस  तू  वेदकांची सून 

बाबांच्या पश्चात आईचा प्रेमाने सांभाळ करून फेडते मुरूडकरांचं ऋण..

सर्वाना सामावून घेण्याचा खास तुझा गुण..


एकुलत्या एक मुलीवर लहानपणापासून केलेत व्यायामाचे संस्कार ..

सुधृड शरीरयष्टी असणार आहे तिच्यासाठी बहुमोल अलंकार ..


पाककलेत कुणीही धरू शकत नाही तुझा हात , सुंदर रांगोळ्या व कलाकृती असतात खास ..

मोनिका , तुझ्या मध्ये होतो मला आदर्श गृहिणीचा भास ..


प्रेम देतेस , प्रेम घेतेस , प्रेमाचा केलं आहेस खूप मोठा साठा..

आयुष्यभर खुल्या राहू देत आनंदाच्या , समाधानाच्या  व प्रगतीच्या वाटा

स्मिता मुकणे 

इंद्रधनुचे  सातही रंग ही फिके पडतील एवढी सुंदर आहे स्मिता..

माझे शब्दही कमी पडतील जिचे गुण गाता..


तुझा मॉरिशसच्या पार्टीतला डान्स आहे लक्षात..

तुझी ती सुंदर मूर्ती भरली आहे अजूनही हृदयात..


तुझ्या प्रत्येक नृत्यातला आविष्कार असतो खास..

तुझ्या मध्ये होतो मला मोठ्या नृत्यांगनाचा भास..


तुझा स्पष्ट  व तोंडावर बोलण्याचा स्वभाव आहे खास..

मैत्रिणींना हक्काने बोलण्याचा गुण आहे झक्कास..


नातं आपलं मैत्रीचं

दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 

तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू सर्व मैत्रिणीने दिलेल्या  शुभेच्छाच्या पावसात भिजावे..


हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तशीच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. स्मिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂

स्मिता 

आज कविता करताना ठेवावं लागेल प्रत्येक शब्दाचं भान..

कारण स्मिता आहे सर्व गुणांची खान..


जीच्याकडे बघून होतो अन्नपूर्णे चा भास..

तिच्या कृती सांगन्यातूनच  दरवळतो पदार्थाचा सुवास..


प्रत्येक पाक स्पर्धेत खाऊन जाते ही भाव..

कधीच नसतो हिच्याकडे खोटपणाचा आव..


शांत, प्रसन्न व मनमोहक आहे हीची मूर्ती..

हिच्या समाधानी वृत्तीतून पसरते हीची कीर्ती..


दोन हुषार , सुंदर मुलांची ही हुषार आई..

त्यांच्या प्रगतीतून हीचे संस्कार दर्शवून जाई..


तू अशीच खूप प्रगती कर, सुंदर , पौष्टिक व चविष्ट पदार्थ घेऊन ये आमच्या साठी..

तुझं चॅनलला millions मध्ये subscribers मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुझ्या साठी..

स्मिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा💐💐


अनिता  कापसे 

वाढदिवस हा दिन असतो प्रत्येकासाठी खास..

सर्वांच्या शुभेच्छा याव्यात अशी मनी असते आस..



अनिता तुझा वाढदिवस विसरला तरी मनी धरला नाही राग..

तुला शुभेच्छा द्यायला आज आली जाग..


यातूनच दिसून आला तुझ्या मनाच्या मोठेपणाचा गुण आहे खास..

तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य असतं झक्कास..



तुझा नृत्याविष्कार पाहून आम्ही होतो थक्क..

प्रेमाने दाखवते मैत्रिणीवर हक्क..


दोन लहान मुलांचा प्रेमाने सांभाळ करतेस..

सोबतच स्वतःचे छंद तू जोपासतेस..


तू असेच तुझे छंद जोपासत रहा, खूप मोठी डान्सर व कोरिओग्राफर  हो हीच ईश्वर चरणी सदिच्छा अनिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐

गिरिशा  दिंडीकर 

अंबरनाथ मधील हुषार   व  गुणी  अशी आहे  जिची ख्याती..

तिचं आहे सर्वांची परिचित दामलेंची स्वाती.. 


दामलेंच्या घरी स्वाती या नावाला आहे महत्त्व विशेष..

दिंडीकरांकडे केला गिरीशाने  हसत खेळत प्रवेश..


गरजू व्यक्तींसाठी असते ही दाणी..

वेळेप्रसंगी बनते झाशीची राणी..


ज्ञान दानाच काम करून आजीच्या हातावर मारला आहे हात..

वेळोवेळी देते सर्वांना प्रोत्साहनाची साथ..


दोन सुंदर गोड मुलींची ही  आहे आई..

संस्कार करण्यात कधी करत नाही दिरंगाई..


सतत नवीन शिकण्याचा असतो हिला ध्यास..

स्वतः सोबत इतरांना पुढे नेण्याचा गुण आहे खास..


सतत हसत खेळत रहा,हीच ईश्वचरणी सदीच्छा

गिरीशा तुला वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा💐💐🍫🍫


शिल्पा लाठी 

आज आमच्या अभिनय 

सम्राज्ञीचा वाढदिवस आहे खास..

तिचा अभिनय बघून होतो सच्चा अभिनेत्रीचा भास..

 

तुझा प्रत्येक अभिनय आहे ध्यानात..

 तुझ्यातली माधुरी दीक्षित अजूनही भरली  मनात..


तुझ्यामुळे पूरी होते आमची शॉपिंगची हौस..

लॉकडाऊन मध्येही पाडतेस फॅशनचा पाऊस..


वेळात वेळ काढून देतेस प्रत्येक मेसेज ला रिप्लाय..

 असाच अखंड चालू राहू दे प्रेमाचा मैत्रीपूर्ण सप्लाय..


तू एक अभिनेत्री, मैत्रीण म्हणून छान आहेसच 

पण " शिल्पा लाठी " म्हणून प्रत्येकाच्या मनात वेगळाच ठसा उमटवला आहेस..

 तुझ्या उद्योगात, वयक्तिक आयुष्यात  खूप खूप प्रगती होही हीच ईश्वर चरणी सदिच्छा..

शिल्पा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️💐💐


जोत्स्ना  भानारकर 

आज माझ्या मनाने घातलीय जोत्सनाच्या मनाला साद..

आज माझ्या कवितेला हवी आहे फक्त तुझीच दाद...

 

आम्ही सर्वजण पाहत आहोत तुझ्या सुखरूप  येण्याची वाट..

 तू परत येताच करणार आहे मी तुझा शब्द रुपी थाट..


तू आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेस याचं तुला नसेल भान


तू तर आहेस आमच्या मंडळाची जान


जोत्सना तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..💐💐🍫🍫

स्मिता 

सतत हसत खेळत राहणारी आमची मैत्रीण स्मिता

कमी पडतील शब्द जीचे गुण गाता..

भाषा बदलली,प्रांत बदलला 

तरी केला नाही कधी बाऊ


ठरवलंच आहे स्मिताने जिथे जाऊ तिथे प्रेमाचे गाणे गाऊ

 

दोन गोड मुलींचे लाड ही पुरवते

वेळात वेळ काढून स्वतःचे छंद जोपासते


मंडळामध्ये सादर केलेला कपल डान्स अजूनही आहे ध्यानात,

तुझी साधी, सरळ लक्ष्मीरुपी मूर्ती कोरली आहे मनात


तू अशीच सतत हसत खेळत , स्वतःचे छंद जोपासत रहा, तू जशी आहे तशीच खूप खुप छान आहेस..

आयुष्यभर अशीच हसत खेळत रहा हीच ईश्वर चरणी सदिच्छा

स्मिता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫


प्रिय सुप्रिया..

सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

सुप्रिया क्षीरसागर 

वाढदिवसाला कविता करण्याची खरी कल्पना मला तुझ्याकडून मिळाली. फ्रेंडशीपडे दिवशी तू माझ्यावर एक कविता केली होती , ती कविता वाचून मला इतका आनंद झाला होता म्हणून सांगू, तुझी कविता सर्वांना दाखवत होते. आपल्याबद्दल कुणीतरी इतकं चांगल लिहलय या भावनाच खूप सुंदर होत्या. त्याच दिवशी पासून मी ठरवलं आपणही असा आनंद इतरांना देऊ व चालू झाला कवितांचा प्रवास तो कविताच्या वाढदिवसा पासून. या सुंदर कल्पनेच बीज माझ्यात रुजवल्याबद्दल खूप खूप  धन्यवाद.

तू जेवढी दिसायला सुंदर आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने मनानी सुंदर आहेस. कितीतरी प्रसंगातून ते तू दाखवून दिलंस.

तू एक आदर्श  आई आहेस, बायको आहेस, सासू आहेस, मैत्रीण आहे व एक व्यक्ती म्हणून खूप खूप छान आहे.

तुझ्यासारखी मैत्रीण आम्हाला लाभली त्याबद्दल ईश्वराचे आभार मानते.

तू अशीच सतत हसत खेळत रहा..तुला परत ऐकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐

अंजली औटी 

जिच्या डोळ्यात सतत असतात प्रेमळ भाव ,

तिचं  अंजली  हे नाव..


स्वतःच्या सुंदर कलागुणांचा मुलींवर असतो पाऊस..

त्यांच्याकडे बघून पुरी करते स्वतःची हौस..



दोन्ही पिढ्या सांभाळताना बणते उत्तम दुवा

म्हणूनच सर्वांना असतो हीचा सहवास  हवा  


परिस्थिती बघून कसं वागावं याचं असतं तुला नेहमी भान


तुझ्यासारखी हुषार, चाणाक्ष, समजूतदार आई मुलींना लाभली म्हणून त्या आहेत नशीबवान

 

तुझ्यासोबत काम करायला मिळावं ,शिकायला  मिळावं हीच माझी अपेक्षा

 अंजली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template