संध्या म्हात्रे मॅडम
ज्या व्यक्तीमुळे मिळाली आमच्या प्रगतीला गती..
त्यांच्या विषयी लिहण्यासाठी लेखणी घेतली होती..
शब्द कमी पडतात की काय
हिच मनी भीती..
ऐकाच व्यक्तीसोबत जुळली निरनिराळी नाती..
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेळोवेळी दिसून आल्या निरनिराळ्या छटा..
सर्वांना सोबत घेऊन खुल्या केल्या आनंदाच्या वाटा..
संसार सांभाळून स्वतःसाठी वेळ काढण्याचा मोलाचा देतात सल्ला
त्यांच्या भोवती असतो नेहमी मैत्रिणींचा कल्ला...
तुमच्या या दिलदार स्वभावामुळे जुळलं प्रेमाचं बंधन
संध्यामॅडम तुमच्यामुळेच फुललं आमचं मनोहर कला महिला मंडळाचं नंदनवन
लोखंडाला सोनं करणाऱ्या परिससम संध्या मॅडमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫💐💐
वैशाली विशे
आपण आपले नातेवाईक तर निवडू शकत नाही पण आयुष्यात असे मित्रमैत्रिणी निवडतो जे आपले कुटुंब होतात, अशीच आहे वैशालीची मैत्री..
एकत्र काम करताना असते तिची मोलाची साथ..
प्रत्येकाच्या मदतीला असतो नेहमी हातात हात..
प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार हाच गुण आहे खास..
तिच्या सोबत असताना होतो खऱ्या मैत्रीचा भास..
साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या ,
स्वतःच परखड मत मांडणाऱ्या, स्पष्ट बोलणाऱ्या
पण मनाने साफ असणाऱ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अश्विनी
जिच्या सुंदर सुंदर कथांनी घातलीय सर्वांवर मोहिनी
ती आहे आमची सखी अश्विनी..
स्व - परिचयातून करून दिली स्वतःची ओळख...
खूप दिवस मंडळात असून नव्हती कुणाला या हिऱ्याची पारख..
तुझ्या कथेला असते उद्दात्त विचारांची सांगड..
लेखणीतून पूर्ण करते समाजसेवेची आवड..
तुझ्या कथेतला प्रत्येक पात्र असतो जिवंत..
वाचताना वाटतं कधीच होऊ नये या कथेचा अंत..
इतरांकडून नवीन शिकण्याचा,इतरांना सोबत घेऊन चालण्याचा गुण आहे खास..
एवढी छान लेखकी असून नाही कसला गर्व, नाही अभिमान हा गुण आहे झकास..
तुझ्या लेखणीतून खूप खूप सुंदर लिखाण होऊ दे हीच सरस्वती चरणी सदिच्छा..
अश्विनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫
सरिता सूर्यवंशी
बोलण्यात आहे मधुरता, स्वभावात आहे सरलता तिचं माझी मैत्रीण सरिता..
सुंदर चेहऱ्यावर शोभून दिसतं हास्य
सुंदर व्यक्तिमत्त्वाचा हेच जणू रहस्य.
सुंदर तरुण मुलींसोबत राहते जणू मैत्रीण आहे खा
आई आणि मैत्रीण या दोन्ही नात्याचा दरवळतो सुवास
कर्तव्य पार पाडण्यास नेहमी असते ह
या पोलीसाच्या बायकोला लागू नये कोणाची नज
सरिता तू दिसायला तर आहेसच खूप सुंदर पण मैत्रीण म्हणून इतकी सुंदर आहेस की, लिहायला शब्द ही कमी पडतात
अश्या या मनमिळावू मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🍫🍫💐💐..
जिग्ना पटेल
जिग्ना, तुम्हें खुशियां भरा संसार दे,
जीवन में तरक्की हजार दे,
तुम्हारे होठों कभी न भूले मुस्कुराना
Birthday पर ऐसा उपहार दे।
ये दिन बार बार आये, ये Dil बार बार गाये,
तू जिए हजारों साल, यही है मेरी आरजू ,
Happy Birthday To You.💐🍬
मृणालिनी
मृणालिनी साठी खास,
मनोहर कला महिला मंडळातील जी मुलगी आहे सर्वात गुणी..
ती आहे शांत , सुशील आमची मैत्रीण मृणालिनी..
ज्यांच्या सानिध्यात नेहमी असते मृणालिनी..
त्यांना मिळाली आहे मैत्रीची संजीवनी..
तुझ्या अगरबत्ती व कापराचा दरवळला आहे घरोघरी सुगंध..
त्यातूनच दर्शवतो तुझ्या मैत्रितला आनंद..
बिझनेस करण्याची तुझी कल्पना आहे छान..
ग्रुप मध्ये जाहिरात टाकताना तुला असते वेळेचे भान..
माझ्या प्रत्येक लिखाणाला असते तुझी आठवणीने दाद..
कायम स्मरणात राहील तुझी प्रेमाची साद..
तू आहेस तशीच खूप छान आहेस, अशीच सतत हसत खेळत, सर्वांना मदत करत रहा हीच ईश्वर चरणी सदिच्छा
मृणालिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐🍫🍫
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment