मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

पिवळा रंग

आजचा रंग आहे पिवळा 




नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे


पिवळा रंग मैत्रीपूर्ण, मुक्त, बाहेर जाणारा आणि आनंदी असण्याशी संबंधित आहे. पिवळा रंग एक खेळकर, आनंदी, विनोदी मूड प्रवृत्त करतो.


तुम्हाला वाटते की कोणता रंग सर्वत्र आनंदाशी संबंधित असावा?" पिवळ्या रंगावर नजर टाकणाऱ्याला लगेच प्रसन्न करण्याची ताकद कशामुळे मिळते? बरं, याकडे पहा. पिवळा हा सूर्याचा आणि सूर्यप्रकाशाचा रंग आहे. पिवळा वसंत ऋतुशी संबंधित आहे. पिवळा हा हसरा चेहऱ्यांचा रंग आहे! पिवळा, अशा प्रकारे जाहिरातदार आणि विपणक आनंदाची भावना निर्माण करण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी वापरतात.


स्माइली किंवा इमोटिकॉन पिवळे का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 


कारण पिवळा रंग मेंदूतील सेरोटोनिन नावाचे रसायन बाहेर टाकण्यास मदत करतो जे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करते, ज्याला आनंदी रसायन देखील म्हटले जाते. अभ्यासांनी सिद्ध केले आहे की पिवळा रंग तुमचा मेंदू जागृत करतो आणि एकाग्रता वाढवतो. रंग मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार, पिवळा रंग डाव्या मेंदूतील क्रियाकलाप देखील वाढवतो जो तर्कशुद्ध विचार आणि विश्लेषणात्मक क्षमतेसाठी जबाबदार असतो.


 किचन मधल्या काही रंगांच्या वस्तूचे महत्व सांगणार आहे आजचा कलर आहे पिवळा म्हणजेच पिवळा रंग हा मुख्यता डाळींचा असतो त्यामुळे  मी तुम्हाला तुर डाळीचे महत्त्व  सांगते.


रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीर

anemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळते. त्याचप्रमाणे प्रसूती संदर्भातील विकार दूर करण्यासाठी तूरडाळीचे सेवन आवश्य करावे.


स्थूलतेवर नियंत्रण

तुरीच्या डाळीचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुरीच्या डाळीमध्ये कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि फॅटचे प्रमाण देखील कमी असते. तसेच या डाळीचे सेवन केल्यामुळे ऊर्जा मिळते आणि व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो.


पचनात सुधारणा

पचन संस्था चांगली असल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. त्यासाठी आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. पचनासाठीरक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीर

anemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळते. त्याचप्रमाणे प्रसूती संदर्भातील विकार दूर करण्यासाठी तूरडाळीचे सेवन आवश्य करावे.


हृदयाचे आरोग्य

हृदयाच्या आरोग्यासाठी तुरीच्या डाळीचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर असते. त्यात पोटॅशियम असते. त्यामुळे रक्तदाब नियमित राहण्यास मदत होते. तसेच शरीराचा रक्तदाब योग्य राहतो आणि हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template