मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

हिरवा




हिरवा

हिरवा रंग आर्थिक उन्नती, मानसिक स्वास्थ्य, शांताता समृद्धी हा रंग देतो. जी आहे ती स्थिती उंचवतोय. मग हिरव्या रंगाकडून आपण काय शिकायचे ? मी आहे, माझे असणे, माझ्या विश्वात जे काही आहे ते आहे. त्याला अधिक चांगले कसे बनवायचे ह्यासाठी आपल्या परीने काम करत राहणे.


हिरवे चणे


💚#हिरवे चणे खाण्यासाठी जितके स्वादिष्ठ असतात, तितकेत आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. याची पौष्टिकता आपल्या शरीरातील काही कमतरता दूर करतात.

 💚#हिवाळा हंगामी भाजीपाल्याचा खजिना घेऊन येतो. हिवाळ्यात येणाऱ्या बर्‍याच भाज्या केवळ चवच नव्हे तर आरोग्याच्या बाबतीतही अतिशय उपयुक्त असतात. ब्रोकोली, पालक, मेथी आणि  हिरव्या भाज्यांसारख्या बर्‍याच हिवाळ्यातील भाज्या शरीरातील बऱ्याच घटकांची कमतरता देखील दूर करते. या भाज्यांमध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे आरोग्यासाठीही चांगल्या असतात. या सर्वांमध्ये अशी एक भाजी आहे ज्यामध्ये चव आणि आरोग्यासाठी बरेच फायदे सुद्धा आहेत. ती भाजी म्हणजे हिरवा हरभरा. मग ते कच्चे खावं, भाज्या किंवा उकडून बनवून खावं.

हिरवे चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या हरभरामध्ये प्रथिने भरलेली असतात आणि यात सेच्युरेटेड मॅक्रोन्यूट्रिएंट देखील आहेत. हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहित करण्याबरोबरच ते सामर्थ्य देखील प्रदान करतात.


💚#रोग प्रतिकारशक्ती वाढवते#


जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेला हिरवा हरभरा ही हिवाळ्यातील अ जीवनसत्त्वे अ आणि क जीवनसत्त्वांचा सर्वात चांगला स्रोत आहे. यात असलेले अॅन्टिऑक्सिडेंट शरीरातील रोग प्रतिकारशक्तीची क्षमता वाढवते. हे संसर्ग आणि सर्दीच्या सामान्य आजारांपासून संरक्षण करते. हे त्वचेसाठीही खूप चांगले आहे.

हिरव्या चण्यात भरपूर व्हिटॅमिन बी 9 असते म्हणजे फोलेट आणि ते मूड स्विंग्स दुरुस्त करते. फोलेट हे नैराश्याच्या लक्षणांशी लढण्यासाठी ओळखले जाते. सर्दीमध्ये नैराश्य वाढत असल्याने, चणे खाणे हा विकार दूर करण्यास उपयुक्त ठरते. 


यात भरपूर फायबर असते त्यामुळे पचन करणे सोपे होते आणि बर्‍याच वेळेस पोट भरते.  वजन आणि मधुमेह कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हिरव्या हरभऱ्यात जीवनसत्त्वे ई आणि ए देखील भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही जीवनसत्त्वे त्वचा आणि डोळ्यांसाठी खूप चांगले आहेत. यात डोळ्यांसोबत एंटीएजिंग देखील असतं. हिरवा चणे हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमध्ये देखील फायदेशीर आहे. फायबर जास्त प्रमाणात असल्यानं रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा करण्यापासून थांबवते. यात कॅलेरी कमी होते, यामुळे हे खाल्ल्यानं चरबी देखील शरीरात जमा होत नाही.

💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚स्मिता 💚💚💚💚💚💚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template