गुलकंद :
गुलकंदाचे नाव घेतल्यावर मनात एकदम सुगंधित गोडवा निर्माण होतो. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेला हा पदार्थ आपण नेहमी पानातून तर खातोच पण नुसता गुलगंद खाण्याचे फायदे देखील आहेत. गुलकंद दिसायला जितका छान असतो तितकीच त्याची चवही अप्रतिम असते. गुलकंद मुरंब्याप्रमाणेच दिसतो. पण गुलकंद खाण्याने तुमच्या शरीराला फायदा मिळतो हे तुम्हाला माहीत आहे का? गुलकंद खाण्याचे शरीरातील विविध आजार छूमंतर होतात. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला गुलकंद रेसिपी मराठीत देत पण त्याआधी गुलकंद म्हणजे काय हे जाणून घेऊया. गुलाबाच्या ताज्या पाकळ्या साखरेसोबत किंवा मधासोबत मिक्स करून एका निश्चित काळासाठी साठवल्या जातात. काही कालावधीनंतर मध किंवा साखरेत मिक्स केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या रस सोडतात आणि पूर्णतः त्या गोड रसात एकजीव होतात. या तयार मिश्रणाला म्हणतात गुलकंद.
🌹गुलकंदातील पोषक तत्वे :
गुलकंदामधील पोषक तत्व तुमच्या शरीरातील उष्णता शोषून घेण्यास मदत करतात. तुमची प्रकृती जर उष्ण असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करून घ्यावा. तसंच आयुर्वेदात गुलकंदाला औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे. काही औषधांमध्ये विशिष्ट आजारांवरील प्रभाव वाढवण्याकरिता त्यासोबत गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो. बरेचदा काही उष्ण किंवा तिखट खाल्ल्यावर आपल्या पोटात जळजळ किंवा एसिडीटी होते. त्यावेळी एक ते दोन चमचे गुलकंद खावा. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. त्यामुळे घरात तुम्ही नियमित गुलकंद ठेवावा आणि याचे प्रमाणात सेवन करावे.
गुलकंद खाण्याचे फायदे
गुलकंद खाण्याचे फायदे अनेक आहेत. आपण नेहमी पानामधून गुलकंद खात असतो. पण तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळतो. शरीराला याचे काय महत्त्वाचे फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. विशिष्ट आजारांवर गुलकंदाचा चांगला प्रभाव दिसून येतो. त्यामुळे तुम्ही याचा समावेश तुमच्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच करून घ्यायला हवा.
तोंडाला आत पुळ्या आल्यास :
जर तुम्हाला तोंड आलं असेल आणि त्यामुळे काहीही खाणं जमत नसेल तर अशावेळी गुलकंद आवर्जून खा. गुलकंद खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि तोंडात आलेली उष्णताही कमी होते. तोंड आल्यानंतर तुम्हाला काहीही खाणे शक्य होतन नाही आणि तोंडाची जळजळही होते. गुलकंदामध्ये विटामिन बी चे प्रमाण अधिक असते. एका शोधानुसार, विटामिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता असल्यास, तोंड येण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे यावर उत्तम उपाय म्हणजे गुलकंद खाणे. विटामिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेशिवाय यातील थंडाव्यामुळेही शरीरातील उष्णता कमी होऊन उपाय लागू पडतो.
बद्धकोष्ठता :
जर कोणाला बद्धकोष्ठाची समस्या असेल तर जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं. यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. कारण गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सहज जातं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते. एका शोधानुसार, मॅग्नेशियमचे सेवन करण्याने ही समस्या दूर होते कारण यामध्ये लॅक्सेटिव्ह प्रभाव असतो. त्यामुळे तुम्ही नियमित एक लहान चमचा गुलकंदाचा आपल्या दैनंदिन आयुष्यात समावेश करून घ्याव.
तणावावर उत्तम उपाय:
गुलकंदाचे सेवन केल्याने थकवा, शरीरातील कमतरता, शारीरिक पीडा, तणावसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. वास्तविक गुलकंद हे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट असून शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. त्यामुळेच आलेला थकवा घालविण्यासाठी आणि तुम्हाला ताजेतवाने वाटण्यासाठी गुलकंदाचा उपयोग करून घेता येतो. याशिवाय गुलकंदाचा थंडावा थकवा दूर करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतो. शिवाय गुलकंद खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते असेही सांगण्यात अाहे.
चांगल्या स्मरणशक्तीसाठी:
आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. पण तुम्ही गुलकंदाचे सेवन आपल्या पाल्याला नियमित दिल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी गुलकंदाचा फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास अधिक सकारात्मक ठरतात. त्यामुळे नियमित मुलांना गुलकंद खायला दिल्यास, त्यांची स्मरणशक्ती चांगली होते.
. गुलकंद कधी आणि किती प्रमाणात खावा?
सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही गुलकंद खाऊ शकता. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. दिवसातून एक ते दोन वेळाच तुम्ही 1-2 चमचे गुलकंद खा. यापेक्षा जास्त गुलकंद खाऊ नये.
💗🌹🌹स्मिता 🌹🌹💗
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment