मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

ग्रे रंग

 ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुट च  कवच हे गुलाबी रंगाच असत पण आतला गाबा हा ग्रे रंगाचा असतो शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे:


एकदम भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. बरोबर कॅल्शीयम, पोटॅशियम, लोह, आणि विटामीन बी तसेच 90% पाणी असते. बाहेरुन जाड साल असली तरी आत पांढरा किंवा लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्यातरी चालतात.


हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे असे म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे विटामिन सी चे भरपूर कोठार. 

विटामीन सी असले की रोग प्रतीकार शक्ती वाढते. म्हणजे कुठलाच रोग सहजासहजी होत नाही.ह्या फळांमधील अंँटीऑक्सिडंट आणि विकरे केसांचे सौन्दर्य खुलविते. ह्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. ह्यातील लोह रक्ताचे हेमोग्लोबिन वाढवते आणि एनिमेया होऊ देत नाही.

खरे पाहता हे आंबट फळ आहे तरी ह्यामुळे संधीवाताच्या वेदना कमी होतात. तसेच ह्याच्यामुळे दात व हाडे मजबूत होतात. डेंग्यू झाल्यावर आपले हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकार शक्ती पण अत्यंत प्रमाणात कमी होते. पण ह्या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तयच बरोबर हाडे पण मजबूत होतात. तेव्हा डेंग्यू ची भीती हि कमी होईल.


अतिशय महत्त्वाचे म्हणजे हे फळ कन्सर ला अटकाव करते. कारण कि फळामध्ये लायाकोपेन नावाचे विकर असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते. ह्या फ्ल्याच्य सालीत पण पॉलीफेनोल आणि रसायने असतात जे कि काही विशिष्ट कॅन्सर पासून संरक्षण करते.

रक्ताल्पता असलेल्या एनिमिक गर्भवतीनां रक्तातील होमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी होमोग्लोबिनची मात्र कमी पडते. ह्या फळाच्या सेवनाने गर्भवती चे होमोग्लोबिन वाढते.

माणसाचे जे जे मोठे शत्रू रोग आहेत त्या त्या सर्वांचा हे फळ नाश करते. रोगप्रतिकार शक्ती पासून ते कॅन्सरविरोधी शक्ती पर्यंत हि शक्ती निरोगी बनवते.


सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे, लठ्ठपणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे ह्या गाळाचे सेवन केल्यास लठ्ठपणा व चरबी कमी होण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते.

📓  स्मिता 😇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template