मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

कार्तिक स्नान

 कार्तिक स्नान.

हिंदू धर्मात प्रत्येक सणाला, व्रताला विशेष महत्त्व आहे. मानवाचे शारीरिक व मानसिक  समतोल राखण्यासाठी असे नियम बनवले गेले आहेत . असाच एक नियम कालबाह्य होत चालला आहे तो म्हणजे कार्तिक स्नान.

 कार्तिक स्नान म्हणजे नक्की काय हे आजच्या पिढीला  माहीत नाही . आज मी तुम्हाला कार्तिक स्नान म्हणजे काय, कधी पासून चालू होतो व तो का करावा याची संक्षिप्त स्वरूपात माहिती  सांगणार आहे.

कार्तिक स्नानाची सुरुवात शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते. कार्तिक महिन्याला शास्त्रात पुण्य महिना असे ही म्हणतात. पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात हजारो वेळा गंगा स्नान केल्यानं आणि प्रयाग मध्ये कुंभ स्नानाच्या वेळी गंगेच्या स्नानाचे मिळतं तेच फळ कार्तिक महिन्यात सूर्योदयाच्या पूर्वी  स्नान केल्यानं मिळतं.

ज्या प्रमाणे नदी मध्ये गंगा श्रेष्ठ, देवांमध्ये श्री हरी विष्णूच श्रेष्ठ त्याच प्रमाणे महिन्यात हा कार्तिक महिना श्रेष्ठ आहे. या महिन्यात श्री हरी विष्णू पाण्यात निवास करतात. म्हणून या महिन्यात नदीत किंवा तलावात स्नान करून विष्णू भगवानांची पूजा करण्याचा आणि प्रत्यक्षातसाक्षात्कार करण्याचे पुण्य प्राप्त होते.

कार्तिक महिन्यात सूर्य आणि चंद्रमाच्या किरणांचे प्रभाव माणसांवर अनुकूल पडतात. हे किरण माणसाच्या मनाला आणि मेंदूला सकारात्मक ऊर्जा देतात.  

कार्तिक स्नानासंबंधी खूप साऱ्या आखायिक वाचायला मिळतात. पाप - पुण्याचा विचार बाजूला ठेवला तर कार्तिक स्नान हे नुसतेच शरीराचे स्नान नसून ती एक मनाला घातलेली  ज्ञानाची अंघोळ आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ केल्याने मन सात्विक व प्रसन्न होते . 

या वर्षी मी कार्तिक स्नानाचा  अनुभव घेतला . हा एक महिना माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभुती असलेला महिना होता. या महिन्यात एक ही सुट्टी न घेता सूर्योदया पूर्वी स्नान करून देवाची पूजा करून मंदिरात जाण्याचा माझा नियम होता व तो मी पूर्ण करू शकले याचे मला  समाधान आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template