मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

पाया गणिताचा


 गणिताचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर पाया पक्का करा..

बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांना गणित ह्या विषयाची धास्ती असते.  बऱ्याचदा नावडता गणित हा विषय उद्यावर ढकलला जातो. आणि मग परीक्षा जवळ आली कि एकच धांदल उडते. बऱ्याचदा पालक जेंव्हा मुलांचा अभ्यास घ्यायला बसतात तेव्हा त्यांना आढळते कि मुलाचा गणिताचा पायाच कच्चा राहिला आहे. हळूहळू पालकांची व मुलांची चीड- चिड चालू होते. विषय समजावला जाताच नाही उलट मुलांचा गणीताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो व गणिताचा राग येऊ लागतो

मग काय... गणिताचा फोबिया वाढतच जातो.


कधी कधी मनाची समजूत घातली जाते कि जाऊ दे गणित नाही आले तर. इतर विषय चांगले येतात ना.

गणितालाच काय एवढे सोने लागले आहे. बऱ्याच ठिकाणी मला हेच चित्र दिसून आले आहे.

तर शालेय गणित का महत्वाचे आहे, ते लक्षात घ्या.


मुले जेव्हा मोठी होतात आणि इतर entrance tests देऊ लागतात जसे कि placement tests, MBA entrance test, SAT, GRE, Gmat, Cmat, किंवा NIFT , IBPS, Staff selection अजून बऱ्याच काही, तेव्हा त्या परीक्षांसाठी जो quantitative aptitude नावाचा पेपर असतो, तो पूर्णपणे शालेय गणितावर बेस्ड असतो. अगदी fractions पासून ते ratio-proportion पर्यंत. HCF_LCM पासून percentage पर्यंत. Negative-positive numbers operations ते decimal conversion पर्यंत. हे सर्व basics जे शाळेत शिकवले जातात आणि त्या वेळी दुर्लक्षिले जातात ते सर्व काही नंतर अभ्यासावेच लागतात.

म्हणून सर्व मुलांना आणि पालकांना माझे असे कळकळीचे सांगणे आहे कि मुलांचे गणित हे शाळेत पक्के होणे गरजेचे आहे.


गणिताचा आत्मविश्वास वाढवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे गणिताचा पाया अतिशय मजबूत करणे. एकदा पाया पक्का झाला कि त्यावर इमारत बांधणे सोपे जाते. पाया पक्का करण्यासाठी पाचवीपासून पुढे जे गणित शिकवले जाते त्याची उजळणी करीत राहणे फार महत्वाचे आहे. पण त्या आधी ते कंसेप्ट्स मुलांना समजले आहेत का हे तपासून बघावे लागते. शाळेत अवघ्या ३५ मिनिटांचा एक पिरियड असतो. वर्गात ५०-६० मुले असतात. प्रत्येकाकडे लक्ष देऊन गणिताचा कन्सेप्ट समजावणे शक्य नसते. दिलेल्या वेळात portion शिकवणे भाग असते, त्यामुळे शिक्षकांचा ही नाईलाज होतो. आता तर ऑनलाईन अभ्यासामुळे ही परिस्थिती  आणखीनच गंभीर झाली आहे. गणित हा असा विषय नाही की, जो व्हिडिओ बघून समजेल , यासाठी तुम्हाला हातात वाही पेन घेणे गरजेचे आहे. अशा वेळी  पालकांनीही मुलांच्या शिक्षणात सहभाग घेणे महत्वाचे आहे. 

हे सर्व बघता मी मुलांसाठी खास "Basic Math"  हा गणितचा class चालू केला  आहे. ऑफलाईन स्वरूपात हा क्लास असणार आहे.


अजून काही शंका असल्यास जरूर विचारा. 

7887545163


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template