डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करत आहे. सूर्याचे हे भ्रमण धनुर्मास म्हणूनही ओळखले जातो
सूर्य धनु राशीतून भ्रमण करतो, म्हणून याला धनुर्मास म्हटले जाते. या मसाला धुंधुरमास ,झुंझुरमास अथवा शून्यमास असेही म्हणतात. दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तराणायचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्म मुहूर्त म्हणजेच देवतांची पहाट असते, असे म्हटले जाते. इंग्रजी किंवा मराठी दिनदर्शिकेत या महिन्याचा स्वतंत्रपणे उल्लेख जरी केलेला नसला, तरी या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. धनुर्मास हेमंत व शिशिर ऋतुमध्ये येतो. या महिन्यास शून्यमास असेही म्हणतात. कारण या महिन्यात कोणत्याही प्रकारची शुभकार्ये केली जात नाहीत.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या कालावधीत पहाटेच्या वेळेला म्हणजेच ब्रह्म मुहूर्ताला ओझोन लेअर अतिशय शुद्ध असतो. शुद्ध ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते. तसेच वातावरण प्रदूषणरहित, आल्हाददायक व उत्साहवर्धक असते. त्यामुळे पहाटे फिरावयास जाण्यास तसेच व्यायाम करण्याला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ या महिन्यात दिसतो, असे सांगितले जाते.धनुर्मास कौशल्य आणि बौद्धिक चातुर्य वृद्धिंगत करण्यासाठी हा कालावधी उत्तम असल्याचे म्हटले जाते. महिनाभर हे व्रत पूर्ण केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते .
मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो.
आपण अशा लोप पावत चाललेल्या तिथींची ओळख आपण आपल्या मुलांना करून द्यावी व पूर्ण महिना मुलांसोबत हे व्रत घ्यावे हा लेखामागचा उद्देश
मस्तच
उत्तर द्याहटवा