महिला दिनानिमित्त केलेली कविता
मीच माझा अभिमान..
माझ्या आयुष्याची मीच आहे राणी..
माझ्या कर्तृत्वाची नेहमीच गाते गाणी ..
जमिनीवरी पाय ठेवुनी कल्पनाजीसह उंच आकाशी मी उडे..
यशाची शिखरे गाठता नेहमी माझा पाय पुढे..
संसाराचं अर्थखाते अभिमानाने सांभाळत आहे..
माझ्या देशाची मीच अर्थमंत्री असा मान मिरवत आहे ..
आकाशी झेप घेण्याचे स्वप्न मी पाहत आहे..
भावनासम विमानात बसूनी लढण्याचे शौर्य मी दाखवत आहे..
व्यवसाय जगतात नाव कमावता समाजाचे ठेवते आहे भान..
सुधाजिंची मूर्ती नेहमीच असते मांडूनी हृदयात ठान..
समाजाची घडी बसवता घ्यावा लागतो मज रोष..
तरीही दाही दिशा गर्जतो आमच्या सिंधूताईचाच जयघोष..
संसाराचा तोल सांभाळत , आदर्श गृहिणी मी बनत आहे..
इंदिराजी सारखी पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पाहत आहे..
लाख येऊ दे अडचणी पण मांडणार नाही माझी व्यथा..
पिढ्यान् पिढ्या गात राहील फक्त माझ्याच यशाची गाथा..
सुसंस्काराचे बीज मी पेरत आली जनोजन्मी..
मीच आहे या समाजाची खरी जगत जननी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment