मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

योग प्रबंध स्वमत

 योग प्रबंध  स्वमत 


वृद्धत्व आणि आरॊग्य या एक प्रकारे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . आरोग्य ठीक असलं की वृद्धत्व ठीक आणि वृद्धत्व छान सांभाळ की, आरोग्य ठीक . पण "वृद्धत्व सांभाळ",म्हणजे काय हा फार महत्वाचा प्रश्न आहे,ज्यामध्ये अनेक बाबींचा समावेश सहज होत जातो व गुंतागुंत ही वाढत जाते . खर म्हणजे आजार नाही असं वृद्धत्व असणं हे आजकाल स्वप्नवतच म्हणावे लागेल . म्हणून आजार व त्रास असला तरी त्यासोबत सुखकारक रित्या कस राहता येईल हा महत्वाचा प्रश्न आहे . तक्रार ही आजार असण्यावर कवचितच असते .... वय झाल असं साधं सोपं उत्तर असत पण, त्या आजाराला सांभाळणं व आपल्यासोबत असलेल्या आप्तेष्टआना कमी त्रास व आर्थिक भार होऊ देण हे मात्र कसोटीचंच असत जे जास्त नाजूक परिस्थितीत वृद्धत्वाला घेऊन जात. नातेसंबंधांतील तात्वीक वृध्दांप्रती आचरणाची भूमिका व त्यामधील लढाई बाजूला ठेवली तर माझं वृद्धत्व मी कस पाहतो? यावरती बरच कांही अवलंबून असत . जास्त अपेक्षांचं ओझं न घेता आपलीच क्षमता वाढवणं , आपल्यामध्ये होत असलेला बदल लक्षात घेऊन त्याप्रती जागरूक असणं ,वेळच्यावेळी आवश्यक उपल्ब्ध माध्यमांचा वा गोष्टींचा उपयोग सातत्याने करत राहण, त्यासोबतिलाच आपला इतरांशी असलेला संपर्क सातत्याने राहील , स्वतःला समाजात व आधुनिक तंत्रञानात , आरोयदायी सुविधेमध्ये होत असलेल्या बदला विषयी अद्यावत ठेऊन स्वतःला सहभागी करून आत्मविश्वासपूर्ण जीवन जगत राहणं याला एकप्रकारे समाधान कारक वृद्धत्वा चा सोपा मार्ग मानता येईल जेणेकरून मानसिक सुदृढपणाराखला जाईल .... इतरांवरती कायम आपल्याकडे बघण्याच्या दृष्टीकोन हा आदर्शवत व संवादपूर्ण राहील यासाठी दबाव राहील व यापेक्षाही महत्वाचं म्हणजे शारीरिक त्रास कमी होत वाढणाऱ्या आजारांची तीव्रता कमी करत गुणात्मक वृद्धत्वाचा सुखकारक अनुभव घेणं शक्य होईल . 


वृद्धत्वाचा प्रवास हा ........ अस्तित्वापर्यंत सुखकारक असणं ..... .... यापेक्षा महत्वाच कांहीही नसत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template