मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

प्रबंध प्रस्तावना 1

 “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”

योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे कि तुम्ही युवक असा कि वयोवृध्द, निरोगी असा कि आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. 

आपल्या आयुष्याचे चार टप्पे आहेत बालपण , तारुण्य , प्रौढत्व व वृद्धत्व. यातील बालपण व वार्धक्य परावलंबी असतं म्हणून दोन्हीही वृद्धत्व सारखंच समजलं जातं पण बालपणात असलेलं निरागसतेचं कवच वार्धक्यात गळून पडतं व ते एक शाप होऊनच येतं या जागतिक कारणामुळे वृद्धत्व लांबलं आहे . 

समाजाची हि गरज ओळखून योग् व वार्धक्य याचा समन्व्य घालण्याचा प्रयत्न केला आहे . 

योगाची सांगड जर वृद्धत्वाशी घातली तर "सुखद वृद्धत्व " नक्कीच मिळू शकेल . सुखद व वृद्धत्व या दोन्ही विरोधाभास दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत पण याचा समन्वय योगाच्या माध्यमातून आपण घालू शकतो . वृद्धत्व कोणालाही न आवडणारं , नकोसं असणारं असू शकतं . 


आपण सारे एकटेच जन्माला यतो व एकटेच जगाचा निरोप घेतो . आजच्या विज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामुळे माणसांनी विविध आजारांवर मात केली आहे. माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे. त्यामुळे देशातील लोकसंख्येतील वृद्धांचे संख्या वाढली आहे. वर्षानुवर्षे आपल्या समाजातील संयुक्त कुटुंब व्यवस्था कमी होत चालली आहे. आजचे कुटुंब चौकोनी असते. त्यामुळे घरातल्या, समाजातल्या वृद्धांचा प्रश्न प्रकर्षाने उभा आहे. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपल्या देशातील बरेच तरुण, विशेषता उच्चविद्याविभूषित परदेशात स्थानिक होतात आणि त्यांच्या वृद्ध माता-पित्यांचा प्रश्न निर्माण होतो.

पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती घरात खूप माणसं असतात माणसे असत. वृद्ध, अपंग, आजारी माणसांची काळजी घेत. कुटुंब एक अशी भावना असे, त्यामुळे या गोष्टी जिव्हाळ्याने होत. आज-काल कुटुंबात मोजकीच माणसे असतात. घरातील स्त्री पण नोकरीसाठी बाहेर पडते, त्याचबरोबर पाळणाघर व तयार आहात अशा सोयींमुळे वडीलधाऱ्या माणसांची, त्यांच्या अनुभवांची गरज उरत नाही. सध्या सर्व क्षेत्रात जग इतक्या गतीने पुढे जात आहे की, घरातील माणसे एकमेकांची साधी चौकशी करायला वेळ मिळत नाही. मग लहानशा घरात अडगळ होते. या गतिमान जीवनात त्यांच्यासाठी देण्यास तरुणांकडे वेळ नसतो. मग वृद्धाश्रमांत रस्ता दाखवला जातो.
 ‘वृद्धाश्रम’ म्हटले की ‘टाकले’ हा शब्द एकावर एक शब्द फ्री असावा इतक्या सहजपणे येतो . आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणाचीआपली काळजी घेतली जाण्याची गरज निश्चित असते. तेथे पैसामालमत्ता काहीही उपयोगी पडणार नाही याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवणे ही काळाची गरज बनलेली आहे. प्रत्यक्ष तिथे जाणे ही वेगळी गोष्टपण जाण्याची मानसिकता तयार करायला सुरुवात केली तर सर्व परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात होते हे नक्की.

वृद्धाश्रमात जाणे म्हणजे कुटुंब सोडणे किंवा तोडणे नसून कुटुंब विस्तारित करणे असते.
स्वत:च्या घरात राहण्याइतके सुख कशात नाही हे अगदी खरे आहे, पण घर म्हणजे जागा, दगड, विटा, खोल्या, घरातल्या वस्तू या साऱ्याचा मालक असण्याची भावना की त्यापेक्षाही काही जास्त, काही वेगळे, काही मौल्यवान असे असते? माणसांनी घर बनते. घर भावनिक आधाराने बनते. घरात माणसे नसतील तर आपल्याला घरात राहताना एकटे नव्हे एकाकी वाटत असेल, आपल्याला काही झाले तर कोण येईल धावून? अशी चिंता लागून राहत असेल तर त्यात कोणत्या सुखाचा अनुभव येतो? याचा विचार केला पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template