मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

प्रबंध गाभा १

 ज्येष्ठांच्या  मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी योग संस्कारांचा मार्ग उत्तम  आहे. 

भारतात सुमारे ११ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यातील बरेच लोक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी ग्रस्त आहेत. स्मृतिभ्रंश , सांधेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य, तोल ना सांभाळता आल्यामुळे पडणे व हाड मोडणे आदी समस्यांनी ज्येष्ठ नागरिक ग्रस्त आहेत. यासारख्या व्याधींपासून ज्येष्ठांना दूर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या योगासनांचा आधार घेतला जात आहे. नियमित योगाभ्यास केल्याने या व्याधी बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतात किंवा त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येऊ शकते. 

योग शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर आपले आरोग्य सुधारतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी सारख्या शारीरिक व्याधींवर योग फार परिणामकारक आहे. नैराश्य, ताणतणाव, दुर्लक्षित असल्याची भावना, जोडीदार आजारी असल्यास त्याची काळजी घेताना येणारा 'केअर गिव्हर स्ट्रेस', जोडीदाराचा मृत्यू झाला असल्यास एकटेपणा, स्वतःचे आजारपण, मृत्यूचे भय इत्यादी अनेक मानसिक समस्यांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी योगाभ्यास फार उपयुक्त आहे. नियमित ध्यान केल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते व वृद्धावस्थेत होणारे अल्झायमर्स व पार्किन्सन हे रोग टाळता येतात, असे संशोधनाने सिद्ध झाले असल्याचे जोशी यांनी सांगितले.

ज्येष्ठांनो, ही आसने करा

शरीर संचालन व संधी संचालन हे अवघडले स्नायू मोकळे करतात, रक्तपुरवठा वाढवतात आणि सांध्यांची लवचिकपणा वाढवतात. निरोगी व्यक्तींनी ताडासन, कटी चक्रासन, कोनासन, वीरासन, वृक्षासन, उत्तानासन, पवनमुक्तासन, मर्कटासन, सेतुबंधासन, भुजंगासन इत्यादी आसने करायला हरकत नाही. जर खाली मांडी घालून बसता येत नसेल तर खुर्चीवरही योगाभ्यास करता येतो. विश्रांती देणारी आसने जसे शवासन, मकरासन अवश्य करावीत. ब्लँकेट किंवा उशी यांची मदत घेऊन काही आसनात शरीर पूर्ण रिलॅक्स करता येऊ शकतं, त्याला 'रेस्टोरेटिव्ह योगा' म्हणतात, 

बलशाली मनासाठी हे करा…!

दीर्घ श्वसन, सुख प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी, चंद्र भेदन प्राणायाम या योगासनांमुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो आणि मेंदू अधिक उत्तम कार्य करू लागतो तसेच मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. ओंकार जप केल्याने स्मरणशक्ती वाढते, मन प्रसन्न होते , नैराश्य व चिंता दूर होतात. मन एकाग्र करून ध्यान केल्यास शारीरिक हालचालींमध्ये सुसूत्रता येते, मेंदूमध्ये सकारात्मक परिणाम होतात आणि मनस्थिती चांगली राहते. 'माइंडफुलनेस' म्हणजे सजगता ध्यान, यावर अलीकडच्या काळात बरेच संशोधन झालेले आहे आणि त्यामुळे दुःख, आजारपण, मृत्यूचे भय इत्यादी कठीण परिस्थितीमध्ये मनाचा समतोल राखता येतो, असे आढळून आले आहे. सहजपणे करता येणाऱ्या मुद्रा कुणीही, अगदी रुग्णालयातील रुग्णदेखील करू शकतो, असा सल्ला जोशी यांनी दिला.

या धोक्यांपासून सावध…!

योगासने करताना फार ताण किंवा थकवा येईल, अशी आसने टाळावीत. आपल्या शारीरिक मर्यादा समजून, काही आजार असल्यास त्यांचा विचार करून तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास सुरू करावा. मधुमेह किंवा उच्चरक्तदाब असल्यास सर्वांगासन, शीर्षासन टाळावीत. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो तसेच मधुमेहात डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. दोन आसनांमध्ये पुरेशी विश्रांती घ्यावी आणि सावकाशपणे हालचाल करावी. अचानक आसन बदलल्यास रक्तदाब कमी होऊन त्रास होऊ शकतो. ऑस्टियोपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ असल्यास खाली वाकून तसेच शरीराला पीळ देणारी आसने टाळावीत. कारण त्यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त ताण येतो. थोडक्यात, योगासने करताना अधिक साहस करण्यापेक्षा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आसनांची निवड करावी. जर उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार असल्यास कपालभारती क्रिया व भस्त्रिका प्राणायाम करू नयेत तसेच प्राणायाम करताना श्वास रोखून धरणेदेखील टाळावे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, असा धोका जोशी यांनी वर्तविला.


प्रबंध गाभा १

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template