दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
लग्नाला जाण्यासाठी जळगावला निघालो होतो. छान सुखकर रेल्वेचा प्रवास होता. सोबत सर्व मित्र परिवार होताच. दिवसभराचा प्रवास होता त्यामुळे नाष्टा व जेवणाची व्यवस्था घेऊनच आम्ही आलो होतो. साधारण दहा - साडे दहा च्या सुमारास आम्ही नाष्टा करण्यास सुरुवात केली तेवढ्यात एक सात - आठ वर्षाची मुलगी आमच्या जवळ आली व चपाती मागू लागली आम्ही सँडविच खात होतो म्हणून तिला डिश मध्ये घालून दोन सँडविच दिले आम्हाला वाटलं खूष होईल पण ती बोलली हे नको मला चपाती हवी आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे हे पण घे व चपातीपण , तिने नकार दिला बोलली मला चपातीच हवी आहे . आम्ही तिला चपाती दिली व भाजी देण्यासाठी डबा उघडत होतो तेंव्हा तिने डिश वरती हात ठेवला व बोलली माझ्याकडे भाजी आहे. आम्ही बोललो राहू दे ना ही पण खा ती पण खा पण ती बोलली वाया जाईल नको मला म्हणून निघून गेली.
प्रसंग अगदी छोटासा आहे पण हि छोटीशी मुलगी खूप काही शिकवून गेली. त्या मुली कडे पाहता ती दिवसभर इकडे तिकडे मागून खात असणार तरीही तिने जास्तीचे जेवण घेतले नाही. अन्नाची कमतरता असूनही तिने अन्नाचा हाव केला नाही उलट जेवणाची किंमत ओळखली .माझ्या मनात आलं कोण बरं शिकवलं असेल हिला हिच्यावर संस्कार करणारे पालक कोण असतील ? उत्तर मिळालं या मुलीवर तर परिस्थितीने संस्कार केले आहेत .
आपणही आपल्या मुलांवरती संस्कार करतोच ना व आपल्या आई वडिलांनीही आपल्यावर संस्कार केलेच आहेत अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे हे तर आपल्याला माहीतच आहे तरी आपण व आपली मुलं आवडत नाही म्हणून किंवा चव नाही म्हणून ताटात अन्न टाकतोच . नेहमी टाकत नसाल पण कुठल्या समारंभात ताटात अन्न
आपल्याला हवं तेव्हढंच जेवण आपण घ्यावं म्हणून बुफे सिस्टिम चालू केली पण परत उठण्याचा कंटाळा म्हणून ठेवलेला प्रत्येक पदार्थ आपण घेत राहतो व शेवटी जात नाही म्हणून टाकून देतो . हॉटेल मध्ये गेल्यावरही तोच प्रकार भलेही आपण पैसे देणारे असतो पण अन्न ते अन्न च ना . जेवण वाया घालून आपण देवाचा अपमान करतो.
या छोट्याशा मुलीने खूप छान शिकवण दिली.प्रत्येक वेळी ताटात जेवण घेताना व हॉटेल मध्ये ऑर्डर करताना हि मुलगी डोळ्यासमोर येते .
हीच मुलगी देवाच्या रुपात परत कधी व कशी भेटली हे पुढच्या भागात नक्की वाचा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment