" मुलगा झाला !! दुसराही मुलगाच झाला..
पहिल्या भावाला , दुसरा भाऊ मिळाला..रामाला लक्ष्मण मिळाला" . असा आवाज ऐकून बाळाचे बाबा सुखावले.
" मोठ्याच तर नाव आपण राम ठेवलं नाही , दुसरा असला म्हणून काय झालं? आता याच नाव आपण राम ठेवू, देवाचं नाव ठेवलं की बरं असतं, सतत देवाचं नाव मुखातून निघत , दादा मी तर याच नाव रामचं ठेवणार हं..!!"
आत्याबाई ठसक्यात बोलल्या.
बाळाचं तेजस्वी रूप पाहून आई सुखावली, "अगदी रामा प्रमाणे तेज आहे माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर, वन्सबाई आपण याचं नाव रामच ठेवू"
घरात आनंदी आनंद होता. बाळाला पाळण्यात घालण्या अगोदरच बाळाचं नामकरण झालं ..राम... !!
नावाप्रमाणे राम अगदी शांत होता. भावंडांमध्ये मिळून मिसळून वागण्याचा गुण सर्वांना खूप आवडायचा.
रामसाठीआई बाबांचा शब्द प्रमाण होता. बाबांनी एखादी गोष्ट सांगितली ती केली नाही असं कधीच झालं नाही.
सर्वांचा लाडका राम , प्रत्येकाची कामं अगदी मन लावून करत असे. देवाच्या पुजेपासून ते शेतात काम करण्यापर्यंत सर्व कामं तो नित्य नियमाने करायचा. कुठलंही काम त्याच्या साठी लहान मोठं नव्हतं.
राम जसजसा वाढत होता तसा त्याचा कल शिक्षणापेक्षा, व्यवहारज्ञानापेक्षा समाज कार्याकडेच जास्त चालला होता. वडिलांचा मोठा उद्योग सांभाळन्या पेक्षा तो भजन, कीर्तन व शेताच्या कामातच रमू लागला.
वडीलांच्या लक्षात ही गोष्ट आली , त्यांनी पण खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ झालं. रामचं मन व्यवहारामध्ये लागायचंच नाही.
आईने बाबांना समजावलं," अहो, त्याला शेतीची आवड आहे तर करू दे शेती .. एक मुलगा उद्योग सांभाळेल तर दुसरा शेती"
आईच बोलणं बाबांना पटलं पण त्यांना मनापासून आपल्या मुलाने गादीवर बसून आपला व्यवसाय सांभाळावा असच वाटत होतं.
दोन्ही मुलं मन लावून काम करत होती पण
रामच्या हाताला म्हणावं तसं यश , पैसा मिळत नव्हता.
दोन्ही मुलांची लग्नं करून आई -बाबानी डोळे मिटले.
आई - बाबां जाण्याचा खूप मोठा धक्का रामनी घेतला. त्याचं कश्यातच मन लागत नव्हतं.
शेतीकडे दुर्लक्ष झालं, निसर्गाची साथ नाही त्यातच लग्नाला पाच वर्ष झाली पण पदरात मुल नाही याचं दुःखही होतंच. सगळीकडेच उतरती कळा लागली होती.
काहितरी दैवी चमत्कार झाला व राम - सीतेच्या आयुष्यात आनंदी आनंद आला. पाहिला मुलगा झाला, पाठोपाठ तीन सुंदर मुली झाल्या. राम सीतेचा संसार अगदी गोकुळा प्रमाणे थाटला होता.
अचानक ऐके दिवशी काळानी घात केला..
"अरे याचं नाव राम कश्याला ठेवलं , याच्या जीवनात तर वनवास आला.."
नेमकं रामच्या जीवनात काय झालं हे कळण्यासाठी पुढचा भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि नक्की वाचा वणवांसातील सुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment