सकाळी लवकर उठून अरविंदने आपल्या चित्रांच्या फ्रेम अलगद प्रेमाने बांधून एका पिशवीत ठेऊन दिल्या.
अरविंद एक निष्णात चित्रकार होता. त्यांनी काढलेल्या प्रत्येक चित्रात सजीवता असे, चित्र आपल्याशी जणू संवादच साधत आहे असा भास होई. काढलेल्या प्रत्येक चित्राची खरी किंमत किंवा जाणकार त्याला मिळत नव्हता. कलाकार हा कधीच पैशासाठी काम करत नाही पण कलाकाराला शेवटी पोट तर असतंच असा नाईलाजाने विचार करून आज त्याची लाख मोलाची चित्र घेऊन गावातल्या सर्वात श्रीमंत अश्या इनामदारांच्या वाड्यावर जाण्याचे त्याने ठरवले होते.
सामान्य लोकांना इनामदारांच्या वाड्यावर जाण्याची मुभा नव्हती. अरविंद तिथे जाणार असं कळताच सर्वांनी त्याच्या मनात भीती निर्माण केली होती. "तिथे जा पण इकडे तिकडे नजर फिरवू नको, खालची मान वरती करायची नाही." असा प्रेमाचा सल्ला सर्वांनी दिला.
एका हातात चित्रांची पिशवी व दुसऱ्या हातात छत्री घेऊन अरविंद इनामदारांच्या वाड्यावर निघाला.
वाड्याच्या गेट मध्ये जाताच रक्षकांनी अडवलं. साधा प्रामाणिक कलाकार आहे म्हणून त्याला मालकीन बाईच्या सांगण्यावरून आत पाठवलं.
आत मध्ये प्रवेश करताच आपण कुठल्यातरी सप्ननगरीत आलो असा भास झाला. वाड्यातील व बाहेरील झगमग बघून डोळे दिपून गेले. इनामदारांच्या महालात प्रवेश करताच अरविंदचे पाय कापायला लागले, येवढ्या सुंदर महालात माझ्या चित्राची कदर होणार नाही, आपण इथून बाहेर पडू असा विचार करून परत फिरला तेवढ्यात मागून एक आवाज आला " शुक ..शुक "
आवाज ऐकून अरविंद थबकला.
" परत का जाताय..या बसा ना.."
" नाही ..नाही..मी जातो..चुकून आलो.."
दबलेल्या स्वरात अरविंद बोलला.
" तुम्ही चित्रकार अरविंद ना..तुमच्या चित्रा बद्दल मी खूप ऐकलं आहे. या बसा ना.." विनंती स्वरात एक तरुणी बोलत होती.
पाठ फिरवलेल्या अरविंदला त्या मंजुळ स्वरातल्या तरूनिकडे बघण्याचा मोह आवरला नाही.
गोड व मंजुळ स्वरातली तरुणी तिच्या आवाजापेक्षा किती तरी सुंदर होती जणू अप्सराच. तिच्या मोहक रूपाला पाहत हृदयात तिची छबी कोरण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. प्रत्येक्षात स्त्री इतकी सुंदर असू शकते याचच त्याला नवल वाटत होतं. कितीतरी वेळ तो टक लावून डोळ्याची पापणी न हलवता तिच्याकडे पहात होता. एवढ्यात आवाज आला," ये कोण रे तू..कोण आहे तिथे...तुझी हिम्मत कशी झाली, माझ्या बहिणीकडे बघण्याची."
या जोरदार आवाजाने अरविंद भानावर आला. ती सुंदर राजकुमारी घाबरली व आपल्या भावाच्या मागे उभी राहिली.
आपल्या वाड्यावर येणाऱ्या व बहिणीकडे टक लावून बघणाऱ्या अरविंदला काय शिक्षा मिळेल...अरविंद मुळे राजकुमारी स्वतचं आपल्या या जन्मातून परत कशी नव्याने जन्मेल...पाहूया पुढच्या भागात..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment