मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

वजनचं ना...?त्यात काय एवढे..भाग१!!


वजनचं ना...?त्यात काय एवढे..भाग१!!


 " फक्त वजनाचाच प्रश्न आहे ना... कश्याला एवढं छान हातचं स्थळ सोडता, शोधून सुद्धा असं स्थळ सापडणार नाही.."

" अहो, पण आमच्या सोनलने स्वतःला छान मेन्टेन केलं आहे. ती वजन वाढवायला कधीच तयार होणार नाही."
" लग्नाच्या अगोदर अशी मुलींची नाटकं असतात ,लग्न झाल्या की फुगतातच की.. !! एक महिन्यात तिला फक्त दहा किलो वजन वाढवायला सांगा..बघा कशी राजा -  राणीची जोडी शोभेल.."
वजन वाढवण्याचा भुंगा शुभांगीताईच्या डोक्यात सोडून जोशीकाकू निघून गेल्या..
घरी येताच शुभांगीताईचा तोंडाचा पट्टा चालू झाला.
" बरोबरच आहे जोशी काकूंच, फक्त दहा किलो वजन वाढव म्हणजे आकाशरावांना कशी शोभून दिसशिल तू.."
" अगं आई,  शोभून दिसेल काय...!!मी वजन  वाढवण्यापेक्षा त्याला कमी करायला सांगा ना..केवढा ढोल आहे.. बरं झालं त्याने मला नकार दिला, मीच त्याला नकार देणार होती.." नाक मुरडत सोनल बोलली
" त्याला तू आवडली आहेस पण तो  बोलतो त्याच्या समोर तू एवढीशी दिसतेस.. क्लास वन ऑफिसर आहे तो.. भारदस्त साहेबांची बायको भारदस्त दिसायला हवी ना...!!"

दोन्ही घरात  स्थळ आवडलं होतं पण जोडी शोभून दिसण्यासाठी सोनलनी  तिचे वजन वाढवायला हवे होते.
सर्वांनी खूप समजावून सांगितलं त्यावेळी नाईलाजाने सोनल तयार झाली.

वजन कमी करण्यापेक्षा वजन वाढवणे कधीही सोपेच असते असा विचार करून वजन वाढवण्यासाठी प्रयत्न चालू झाले..

खाण्या पिण्याच्या बाबतीत सतत जागृत असणाऱ्या सोनलला आता सतत खाण्याचा सल्ला दिला जात होता.जेवणात तेल - तुपाचा मारका वाढला. वाटीभर खिचडीवर चार- पाच चमचे साजूक तुपाची धार सोडली चालली.
पिझ्झा ,बर्गर चे पार्सल सतत घरी येऊ लागले.
सकाळचा वॉक, योगा बंद झाला. सकाळी उशिरा उठणे, हेवी नाश्ता, दुपारचे व  रात्रीचे चारीठाव जेवण , संध्याकाळचे आचर -बचर खाणे चालूच होते. एकूण घरातल्या सर्वच लोकांची मज्जा चालू होती. सोनालचा छोटा भाऊ साहिल त्याची तर छान लॉटरी लागली होती. खाण्यापिण्याचा हट्ट न करता सगळं मिळत होतं, हीच भाजी खा  , तेच छानआहे ,हे नको खाऊ असा हट्ट बंद झाला . मागच्या पंधरा दिवसापासून शुभांगीताईच घर हसत खेळत निरनिराळ्या पदार्थावर ताव मारत मजेत नांदत होतं.
सोनालचे फुललेले गाल पाहून , आकशरावांसारखा श्रीमंत जावई आपल्याला मिळणार या आनंदात शुभांगीताई लग्नाच्या तयारीला लागल्या.
सोन्यासारखा जावई मिळणार तर  प्रश्न फक्त वजनाचाच आहे ना....!! त्यात काय एवढे..!!

पाहूया सोनलच्या लग्नाची व वजनाची कहाणी पुढच्या भागात..








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

सेकंड ओपेनियन

  आज  व्हॉटस अप्प वरती फिरणारा लेख वाचनात आला .  व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांचा संदर्भ देणारा लेख होता . या लेखामध्ये आपले सेकंड ओपेनियन...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template