मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

"याला बकेट लिस्ट म्हणतात का..?" भाग 1


" आजी,जुन्या घरात सामान आवरताना तुझी बकेटलिस्ट मिळाली बरं का..." हसत हसत सौरभ बोलून गेला.

" अरे ,मी कुठे तुला  सगळे बकेट आणायला सांगितले होते,फक्त ते निळ्या रंगाचे छोटे बकेट आण असं सांगितलं होतं, बकेटाची लिस्ट नव्हती दिली.." लटक्या स्वरात आजी बोलल्या.
" आजी, मी ते बकेट म्हणत नाही . तुझी ती वही ज्यात तू तुझ्या अपेक्षा लिहून ठेवल्या होत्या, तुला भविष्यात काय करायचं आहे . विसरली का..?"
" याला बकेट लिस्ट म्हणतात का..?" आजीने ऊत्सुकतेने विचारले.
" हो, त्यालाच म्हणतात.." सौरभने काहीतरी काढण्यासाठी पिशवीत हात घातला.

" माझी वही मिळाली तुला..?कुठे आहे ...?वाचलीस तू... ?कोणाला दाखवली नाहीस ना...आणलीस इथे..दे ना मला.." इतके सारे प्रश्न आजीने एका झटक्यात विचारले.

" हो..हो..मी आणली आहे इथे. मी कोणाला दाखवली नाही पण सॉरी , मी वाचली तुझी  बकेटलिस्ट.."कानाला हात लावत माफी मागण्याच्या स्वरात सौरभ बोलला.
" वाचला तर ठीक आहे पण कोणाला काही बोलू नको या बद्दल..दे माझी वही.." हात पुढे करत आजी बोलल्या.


" हो मी देतो पण मला प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांग बरं..नाहीतर मी देणार नाही.."
वही पाठीमागे लपवत सौरभ बोलला.

"दे , मी सांगते तुला .." असं म्हणत आजीने वही हातातून खेचूनच घेतली.

" ही वही मी विकत घेतली 1960 साली त्यावेळी मी सहावीत होते. आमच्या बाईनी आम्हाला अशी  वही करायला सांगितली होती. तुम्हाला तुमच्याकडून काही ईच्छा, अपेक्षा असतील त्या यात लिहून ठेवा व रोज ही वही काढून बघायची व ती अपेक्षा पूर्ण झाली की बरोबरच चिन्ह काढायचं  व पुढे लिहीत रहायचं असे सांगितले.
सहावीत शाळेतून पहिली येण्याची अपेक्षा लिहून काढली. रोज ही  वही काढून  वाचत रहायची, नित्यनियमाने अभ्यास केला व आला की शाळेत पहिला नंबर...खूप आनंद झाला. वही कडून व पर्यायाने माझ्याकडून माझ्या अपेक्षा वाढल्या ,लिहून काढायच्या व पूर्ण करायचा हा जणू ध्यासच मला लागला. बाईचां आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षिका होण्याचं स्वप्न बघू लागली ,वही मध्ये अपेक्षा लिहून काढली.
दहावीची परीक्षा दिली व तुझ्या आजोबांचं स्थळ सांगून आलं, घरात सर्वांनी मिळून माझ लग्न ठरवलं. सासरी एकत्र कुटुंब होतं. माझ्या अपेक्षांची पूर्तता आता होणार नाही हे मला कळून चुकलं होतं. सासरी येताना आठवण म्हणून ही वही आणली होती. एकेदिवशी कपाटात ही वही बघून आजोबांनी सहजच वाचली, माझी शिक्षणाची ओढ बघून त्यांनी DEd साठी माझं एडमिशन केलं. घरातल्या लोकांचा विरोध पत्करून कॉलेजला जाऊ लागली, मनलावून अभ्यास केला. शिक्षणामुळे दोन वर्ष आम्ही मुलं होऊ दिलं नाही. शिक्षण क्षेत्रातील पदवी प्राप्त झाली व जवळच्याच शाळेत नोकरी लागली.
आता वही परत मला खुणावत होती, नुसतीच शिक्षिका नाही तर मला आदर्श शिक्षिका बनायच होतं. त्या दृष्टीने प्रयत्न चालू झाले पण आता बाळाची चाहूल लागली होती. नऊ महिने नोकरी केली व बाळंतपनानंतर  घरीच बसली कारण तुझ्या आजोबांची बदली जिल्हाच्या ठिकाणी झाली व मुलाला सांभाळायला कोणीच नव्हतं.


पुढची दहा वर्ष एक आई व म्हणून पत्नी म्हणून स्वतःकडून भरपूर अपेक्षा केल्या व त्या या वहीत लिहून ठेवल्या. संकटकाळी तुझ्या आजोबा सोबत असण्यापासून ते आदर्श आईचा पुरस्कार मिळवण्यापर्यंत सर्व अपेक्षा पूर्ण केल्या.
या दहा वर्षात मला बाहेर पडता येत नाही म्हणून कधीही नाराज झाली नाही.नशिबाने घराच्या जवळच्या शाळेत मला नोकरी मिळाली. घर सांभाळून दहा वर्ष नोकरी केली व आदर्श शिक्षिका म्हणून माझी निवड झाली.
माझ्या गंभीर अपघातामुळे मला परत नोकरी सोडावी लागली, या आजारपणात मी माझे पाय गमावून बसले होते...कायमची परावलंबी झाले होते .
वही माझा पिच्छा सोडत नव्हती, जगण्याच्या नवीन वाटा दाखवत होती. मी ही जिद्दीने लढण्याची तयारी दाखवली व ही वही पूर्ण केली..

आजीच्या वहीत अजून काय सामावलं आहे, आजीची राहिलेली शेवटची बकेट लिस्ट नातू कशी पूर्ण करेल पाहूया पुढच्या भागात...





 #बकेटलिस्ट

४ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template