आज एमपीएससीचा निकाल लागला. सुमितला घवघवीत यश मिळालं. घरातून , गावातून नातेवाईकांकडून कौतुकच कौतुक होतं होत. आपल्या मागच्या चारही पिढ्यांमध्ये कोणीही सरकारी खात्यात तेही उच्च पदावर कामं केला नाही पण माझा मुलगा हे करणार या विचारानेच बाबांचा आनंद ओसंडून वाहत होता.
आईचे पाय तर जमिनीवर नव्हतेच ,मुलाला कुठे ठेऊ ,कुठे नको असे झाले होते.
आता घरच्या लोकांना आपल्या मुलाच्या लग्नाचे वेध लागले. प्रत्येक वेळी सुमित लग्नाचा विषय टाळत होता , " मला चांगली नोकरी लागल्या शिवाय लग्नच करणार नाही ." असं ठामपणे त्यानी सांगुनच टाकलं होतं.
आता नोकरी लागली त्यामुळे घराच्या लोकांसमोर कारण काय सांगणार हाच मोठा प्रश्न सुमित समोर पडला होता.
लग्न तर सुमितला करायचं होतं पण त्याच्या आवडत्या माधुरी सोबत..
माधुरीचं नाव मनात आलं व सुमितच्या ह्रदयात सुखद कळ आली.पाच सहा वर्षापूर्वीचा तो दिवस आठवला...
आज काही झालं तरी मला तिला सांगायचंच आहे असं म्हणतं मन घट्ट केलं कॉलेजच्या मगाच्या गेटच्या बाजूला तिची वाट पहात उभा होता. ती दिसताच स्वतःला सावरलं व छातीवर हात ठेऊन बोलला.." All is well , All is well".
या त्याच्या बोलण्यात माधुरी पुढे निघून गेली.
धावत धावत तिच्या जवळ गेला, " माधुरी थोडं बोलायचं होतं, मी तुझा खूप वेळ घेणार नाही, फक्त दहा मिनिट, please नाही नको म्हणुस."
एका दमात सुमित सर्व बोलून गेला.
माधुरी बोलली," ठीकआहे. बोल ना..."
माधुरीचा तो शांत स्वर ऐकून सुमित खुश झाला.
ही थांबली याचा अर्थ मला जे वाटतं ते हिला पण..
" माधुरी तू मला खूप आवडतेस , माझ्याशी लग्न करशील.."
सुमितचा हा प्रश्र्न ऐकून माधुरी शांतपणे उभी होती.
" सुमित इथे नको .आपण बाहेर, गार्डन मध्ये जाऊन बोलायचं का?" माधुरी बोलली.
सुमितने होकार दिला पण धीर निघत नव्हता.
बाहेर येताच माधुरीने समोरच्या खुर्चीत बसांयची खूण करत स्वतः खुर्चीत जाऊन बसली.
" सुमित तू मला लग्नाची मागणी घातली ती मला मान्य आहे . आपण लग्न करू पण आता नाही. आपण आता पहिल्या वर्षात शिकत आहोत. अजून आपल्याला खूप शिकायचं आहे. नोकरी करायची , आपल्याला आपल्या पायावर उभं रहावं लागेल. आपण या वयात प्रेमाची नाटकं केली, व आपला मोल्यवान वेळ वाया घालवला तर आपलं भविष्य आपण घडवू शकणार नाही.
तू खूप शिक , चांगली नोकरी मिळव व माझ्या घरी लग्नाची मागणी घालायला ये, मझ्या घराच्या लोकांनी विरोध केला तरी मी तुझ्या सोबत लग्न करेन..विश्वास ठेव माझ्यावर.." सुमितच्या हातावर हात ठेवत माधुरी बोलली.
माधुरीच्या बोलण्यामुळे सुमित भारावून गेला. ही दिसायला जेवढी सुंदर आहे त्या पेक्षा हीचं मन , समजूतदार वृत्ती मनाला भावली.
" आज आपली ही शेवटची भेट. याच्या पुढच्या भेटीत तू मला मागणी घालायला येशील..मी वाट बघते तुझी.."
असं म्हणत माधुरी निघून गेली..
तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत सुमित बसून राहिला.
लवकरच माधुरीला मागणी घालायला जाणार अशी खूण गाठ मारत एका झटक्यात एमपीएससी चा पल्ला गाठला.
आता जिची मनापासून वाट पाहतोय ती आपली माधुरी कुठे असेल ......माझी वाट नक्कीच पहात असेल..
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment