रामचा संसार अगदी दृष्ट लगण्यासारखा रंगला होता. आर्थिक चणचण होतीच पण समाधानी बायको व तल्लख बुद्धीची मुलं त्यावर सर्वांनी मिळून मात केली.
मुलांचं व्यवहारी ज्ञान व शैक्षणिक प्रगती पाहून राम - सीतेचे डोळे दिपून चालले होते. आपण आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं नाही पण आपली मुलं आजोबांचं स्वप्न पूर्ण करतील याची रामला खात्री होती.बाबांचा पापभिरू व सतत लोकांना मदत करण्याचा स्वभाव मुलाला खटकायचा. आपले बाबा खूप साधे आहेत लोकं त्यांचा गैर फायदा घेतात याची जाणीव मुलांना झाली होती.
मोठ्या येकुलत्या एका मुलाने आजोबांच्या व्यवसायात डोकं घातलं . चांगला पैसा मिळू लागला मोठ्या भावाने बहिणींचे शिक्षण पूर्ण केले. सर्व कसं आनंदात चालू होतं पण कोणाची तरी वाइट नजर लागली व अपघातात रामचा कर्तबगार मोठा मुलगा गेला...
दुःखाचा डोंगर रामवरती कोसळला. ज्या वयात मुलाच्या अंगावरती संसार सोडून देवाचं नाव घेत जीवन व्यतीत करायचं ठरवलं त्याचं वयात मुलाला अग्नी देण्याचा कठीण प्रसंग रामवर येऊन ठेपला . सर्वात मोठा शोक म्हणजे पुत्रशोक .
त्याच वेळी कोणीतरी बोलून गेलं " रामचा वनवास चालू झाला.."
लोकांचं हे बोलणं मुलींच्या जिव्हारी लागलं. दादा गेला म्हणून काय झालं , आम्ही आमच्या आई बाबांच्या आयुष्यात वनवास कधीच येवू देणार नाही असा निश्चय तिन्ही मुलींनी केला.
आर्थिक बाजू बळकट करत, आई बाबांना आधार दिला. एक मुलगा गेला तर तुमच्या तीन मुलांनी जन्म घेतला आहे असा विश्वास निर्माण केला.
रामच्या जीवनावरती प्रकाश टाकला तर आर्थिक दृष्ट्या कमाई खूप कमी होती, कर्तबगारी, धडाडिवृती नव्हती पण त्याच्याकडे माणुसकीची कमाई प्रचंड होती. गरजू व्यक्तींना, भुकेल्या लोकांना केलेली पुण्याई गाठीशी होती .मुलींना दिलेले संस्कार लाख मोलाचे होते.
आज तिन्ही मुली आई वडिलांनी दिलेल्या संस्कारात आपाल्या संसारात सुखी आहेत . आई बाबांच्या मनात या वयात आत्मविश्वास निर्माण करून स्वाभिमानी व स्वतंत्रपणे जगण्याची इच्छा निर्माण केली. दोघांची मनं कणखर बनवली. राम-सीतेचा जणू पुनर्जन्मच झाला.
आख्या आयुष्यात अनुभवले नाहीत असे सुख दोघेअनुभवत आहेत म्हणूनच राम लोकांना नेहमी बोलतो..
" मी वणवासातलं सुख अनुभवत आहे "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment